S Jaishankar: ''टाळी एका हाताने वाजत नाही'', चीन मुद्द्यावरुन जयशंकर स्पष्टच बोलले

External Affairs Minister S Jaishankar: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी जगासाठी भारताचे महत्त्व पटवून दिले आहे. जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत आहे.
EAM S Jaishankar
EAM S JaishankarDainik Gomantak
Published on
Updated on

External Affairs Minister S Jaishankar: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी जगासाठी भारताचे महत्त्व पटवून दिले आहे. जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत आहे, कोणत्याही मोठ्या जागतिक मुद्द्यावर भारताशी सल्लामसलत केल्याशिवाय निर्णय होत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. परराष्ट्र मंत्री म्हणाले की, जागतिक मुद्द्यांसाठी भारताची संमती अत्यंत महत्त्वाची आहे. शनिवारी नागपुरात एका कार्यक्रमाला संबोधित करताना जयशंकर म्हणाले की, "जगातील कोणताही मोठा मुद्दा भारताशी सल्लामसलत केल्याशिवाय ठरवला जात नाही. आपण बदललो आहोत आणि जगाची आपल्याबद्दलची धारणा बदलली आहे."

परराष्ट्र मंत्री म्हणाले की, 'आपण स्वतंत्र आहोत, वेगवेगळ्या लोकांशी व्यवहार करुन आपले हित कसे साधायचे हे शिकायला हवे.' जयशंकर यांनी भारत आणि चीन यांच्यातील राजनैतिक संबंधांवरही भाष्य केले. जयशंकर म्हणाले की, दोन्ही बाजूंनी तयारी दाखवल्याशिवाय सीमाप्रश्नावर तोडगा निघणे शक्य नाही.

जयशंकर पुढे म्हणाले की, "मी माझ्या चिनी समकक्षांना समजावून सांगितले आहे की जोपर्यंत तुम्ही सीमा विवादावर तोडगा निघत नाही आणि तोपर्यंत सैन्य सीमेवर तैनात राहतील. पण यामध्ये तुम्ही बाकीचे संबंध सामान्य राहण्याची अपेक्षा करु शकत नाही." परराष्ट्र मंत्री पुढे म्हणाले की, 'दोन्ही देश संबंध सामान्य करण्यासाठी काम करत आहेत आणि काहीवेळा राजनैतिक अडथळे दूर होण्यास वेळ लागतो.'

EAM S Jaishankar
S Jaishankar On Canada: 'उलटा चोर कोतवाल को डांटे..."! एस जयशंकर यांनी काढले कॅनडा सरकारचे वाभाडे

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी याआधीही याचा पुनरुच्चार केला आहे. गेल्या वर्षी मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जयशंकर म्हणाले होते की, "भारतालाही चीनसोबतचे संबंध सुधारायचे आहेत पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा सीमा भागात शांतता नांदेल.'' सीमावर्ती भागात शांतता नांदत नाही तोपर्यंत दोन्ही देशांमधील संबंध प्रगती करु शकत नाहीत, असे त्यांनी चीनला पूर्णपणे स्पष्ट केले. उत्तरेकडील सीमेवरील परिस्थिती आणि चीनच्या 'बेल्ट अँड रोड' प्रकल्पाविरोधात देशाच्या भूमिकेचा दाखला देत जयशंकर म्हणाले की, भारत कोणत्याही दबाव, लोभ आणि चुकीच्या विमर्शाने प्रभावित नाही.

EAM S Jaishankar
S. Jaishankar: 'आम्ही गोष्टी रंगवत नाही...' जयशंकर यांचे अदानी प्रकरणाच्या टीकेवर प्रत्युत्तर

दरम्यान, 'बेल्ट अँड रोड' प्रकल्प हा चीनने प्रायोजित केलेला प्लॅन आहे, ज्यामध्ये जुन्या सिल्क रोडच्या आधारे आशिया, आफ्रिका आणि युरोपच्या देशांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्याची योजना आहे. भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाखमधील संघर्षाच्या काही भागात तीन वर्षांहून अधिक काळ तणाव आहे. तथापि, दोन्ही देशांमधील लष्करी आणि राजनैतिक चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर दोन्ही बाजूंनी काही भागात माघार घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com