Security Forces
Security ForcesDainik Gomantak

स्वातंत्र्यदिनी Kashmir मध्ये दहशतवादी हल्ला, पोलीस कर्मचारी अन् नागरिक जखमी

Jammu And Kashmir: बडगाम आणि श्रीनगरमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये एक नागरिक आणि एक पोलिस जखमी झाला.

Jammu And Kashmir: स्वातंत्र्यदिनी जम्मू-काश्मीरच्या बडगाम आणि श्रीनगरमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये एक नागरिक आणि एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. दोन्ही हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांनी ग्रेनेडचा वापर केला. बडगामच्या गोपालपुरा चांदुरा भागात या हल्ल्यात करण कुमार सिंह नावाचा एक व्यक्ती जखमी झाला आहे. सुरक्षा दलांनी या भागात शोध घेतला, तरीही दहशतवादी पकडले गेले नाहीत. सिंग यांना श्रीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Security Forces
Jammu Kashmir सरकारची मोठी कारवाई, हिजबुल प्रमुखाच्या मुलासह 4 जणांची नोकरीतून हकालपट्टी

दरम्यान, या हल्ल्यानंतर काही वेळातच दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील बटामालू भागात पोलीस (Police) नियंत्रण कक्षावर ग्रेनेड हल्ला केला. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. येथेही परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. एक दिवसापूर्वी श्रीनगरच्या नोहट्टामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती, ज्यामध्ये सर्फराज अहमद नावाचा कॉन्स्टेबल शहीद झाला होता.

दुसरीकडे, रेडपुरा पार्कजवळ दहशतवाद्यांनी (Terrorists) दुचाकीवर गोळीबार केला होता. या चकमकीत एक दहशतवादीही जखमी झाला होता. सोमवारी, काश्मीर झोनच्या पोलिसांनी ट्विट करत म्हटले होते की, 'दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत कॉन्स्टेबल सर्फराज अहमद शहीद झाला आहे.'

Security Forces
Jammu And Kashmir: बांदीपोरात बिहारच्या मजुराची गोळ्या झाडून हत्या

तसेच, हे दोन्ही दहशतवादी हल्ले अर्ध्या तासात झाले, पहिला हल्ला 9:05 वाजता झाला आणि दुसरा 9:35 वाजता झाला. काश्मीर झोनच्या पोलिसांनी ट्विट करुन संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे.

Security Forces
Jammu Kashmir: कलम 370 रद्दच्या वर्षपूर्तीलाच पुलवामामध्ये ग्रेनेड हल्ला

लाल चौकात तिरंगा फडकवला

स्वातंत्र्य दिनानिमित्त काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जल्लोष साजरा करण्यात आला. काश्मीरमध्येही स्वातंत्र्यदिन मोठ्या थाटामाटात साजरा करुन तिरंगा फडकवण्यात आला. काश्मिरी नागरिकांनी लाल चौकात तिरंगा फडकावला आणि भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. दल सरोवरातही तिरंगा उत्सव साजरा करण्यात आला आणि या उत्सवात शिकारींनीही सहभाग घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com