आणिबाणीच्या त्या काळ्यादिवसांना विसरु शकत नाही: पंतप्रधान मोदी

२१ महिने निर्दय शासनाचे अत्याचार सहन करत देशाच्या संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी अविरत लढा देणाऱ्या सर्व देशवासियांच्या त्याग आणि बलिदानाला सलाम.
आणिबाणीच्या त्या काळ्यादिवसांना विसरु शकत नाही: पंतप्रधान मोदी
Flickr
Published on
Updated on

नवी दिल्ली : देशात (India) लागू झालेल्या आणिबाणीला (Emergency) आज ४६ वर्षेपूर्ण होत आहेत. आणिबाणीविषयी आपण आजपर्यंत अनेक गोष्टी ऐकल्या असतील. आणिबाणीच्या झळा अनेक वर्षे आपल्या देशाला बसल्या. सामाजिक (Social) , राजकीय (Political) अश्या अनेक संस्थांना तडे गेले. आणिबाणीच्या त्या काळ्या दिवसाला विसरता येणार नाही. १९७५ ते १९७७ या काळात संस्थांचा नाश झाला. असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी यावेळी व्यक्त केले.

२५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणिबाणीची घोषणा केली. २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ या काळात देशात आपत्कालीन परिस्थितीची निर्माण झाली होती. आता याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत काँग्रेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

पंतप्रधान म्हणाले, “आणिबाणीच्या त्या काळ्या दिवसाला विसरता येणार नाही. १९७५ ते १९७७ या काळात संस्थांचा नाश झाला. आपण भारतीय लोकशाही भावनांना बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प करून राज्यघटनेत नमूद केलेल्या मूल्यांचे पालन करुया.” तसेच काँग्रेसने आपल्या लोकशाही आचारांना चिरडले. आणिबाणीला विरोध दर्शविणारे आणि भारतीय लोकशाहीचे रक्षण करणारे सर्व महान लोक यावेळी आम्हाला आठवतात असेही पंतप्रधानांनी नमूद केले आहे.

आणिबाणीच्या त्या काळ्यादिवसांना विसरु शकत नाही: पंतप्रधान मोदी
मोदी सरकारने 2 मोठ्या बँकांच्या खासगीकरणाचा का घेतला निर्णय?

याबरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. " काँग्रेसने आपल्या स्वार्थापोटी आणि अहंकाराने देशावर आणिबाणी लादून जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची हत्या केली होती. असंख्य सत्याग्रह्यांना तुरूंगात टाकण्यात आले आणि प्रेस देखील बंद केले गेले. नागरिकांचे मूलभूत हक्क काढून घेऊन संसद आणि कोर्टाला निःशब्द बनविले. एका कुटुंबाच्या विरोधात उठणारा आवाज शांत करण्यासाठी लावण्यात आलेली आणिबाणी हा स्वतंत्र भारताच्या इतिहासाचा एक गडद अध्याय आहे. २१ महिने निर्दय शासनाचे अत्याचार सहन करत देशाच्या संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी अविरत लढा देणाऱ्या सर्व देशवासियांच्या त्याग आणि बलिदानाला सलाम.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com