Jammu and Kashmir: श्रीनगरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

यातच आता जम्मू -काश्मीर पोलिसांना (Jammu and Kashmir Police) श्रीनगरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
 Terrorists
TerroristsDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) अशरफ घनी सरकार उलथवून तालिबान्यांनी आपली हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवाद्यांच्या कारवाया वाढत असताना दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून जम्मू काश्मीर पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorist) चकमकी होत आहेत. यातच आता जम्मू -काश्मीर पोलिसांना श्रीनगरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यासंबंधीची माहिती काश्मीर झोनचे पोलिस अधिकारी विजय कुमार यांनी दिली आहे. कमांडर अब्बास शेख आणि त्याचा सहाय्यक साकिब मंजूर अशी मृत दहशवाद्यांची नावे आहेत.

काश्मीरचे आयजी के. विजय कुमार म्हणाले की, पोलिसांना श्रीनगरच्या मध्य काश्मीरमधील एका ठिकाणी दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच 10 पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. या दरम्यान पोलिसांनी दोघांनाही घेरले आणि त्यांना इशारा देण्यात आला. यानंतरही समोरून गोळीबार झाला आणि दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. ठार झालेले दोन्ही दहशतवादी टीआरएफ दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. या दोन्ही दहशतवादी कमांडरची नावे जम्मू -काश्मीर पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेडच्या यादीत समाविष्ट होती.

 Terrorists
Afghanistan तून भारतात आलेल्या नागरिकांमधील 2 नागरिक कोरोना पॉझिटिव्ह

'मुलांना दहशतीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवा'

जम्मू -काश्मीर पोलिसांसाठी हे मोठे यश असल्याचे त्यांनी सांगितले. अब्बास शेख दहशत पसरवत होता, यामुळे त्याचे कुटुंबीयही अस्वस्थ होते. त्यांनी सर्व लोकांना आपल्या मुलांना दहशतीच्या मार्गावर जाण्यापासून रोखण्याचे आणि जे गेले आहेत त्यांना परत बोलवण्याचे आवाहन केले. दहशतवादाच्या मार्गाने परत येणाऱ्यांना तो दत्तक घेईल, असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com