'ChatGPT'चा सर्वात स्वस्त प्लॅन लाँच, फक्त 'इतक्या' रुपयांत मिळतील अनेक प्रीमियम फीचर्स

ChatGPT Cheapest Plan: OpenAI ने त्यांच्या लोकप्रिय AI चॅटबॉट ChatGPT साठी सर्वात स्वस्त सबस्क्रिप्शन प्लॅन ChatGPT Go लाँच केला आहे.
ChatGPT Cheapest Plan
ChatGPT Cheapest PlanDainik Gomantak
Published on
Updated on

OpenAI ने त्यांच्या लोकप्रिय AI चॅटबॉट ChatGPT साठी सर्वात स्वस्त सबस्क्रिप्शन प्लॅन ChatGPT Go लाँच केला आहे. कंपनीने या नवीन प्लॅनद्वारे लोकांना परवडणाऱ्या किमतीत ChatGPT चे लोकप्रिय फीचर्स वापरण्याची संधी दिली आहे.

ChatGPT चे उपाध्यक्ष आणि प्रमुख निक टर्ली यांनी X वर पोस्ट करत ChatGPT Go सबस्क्रिप्शनची अधिकृत घोषणा केली. त्यांच्या मते, या नवीन प्लॅनद्वारे वापरकर्त्यांना मोफत प्लॅनच्या तुलनेत अनेक प्रीमियम फायदे मिळतील.

यात १० पट जास्त मेसेज लिमिट, १० पट जास्त इमेज जनरेशन, १० पट जास्त फाइल अपलोड क्षमता आणि २ पट जास्त मेमरी यांचा समावेश आहे. या फीचर्समुळे वापरकर्त्यांना AI चा अनुभव अधिक वेगवान आणि कार्यक्षम बनवता येणार आहे.

ChatGPT Cheapest Plan
Dhirio in Goa: ‘धीरयो’वरून सरकार पेचात! परंपरा की कायदा? आता न्‍यायालयात ‘कसोटी’

ChatGPT Go सबस्क्रिप्शनसाठी दरमहा फक्त ३९९ रुपये खर्च करावे लागतील. याची खास गोष्ट म्हणजे हा प्लॅन UPI पेमेंटला सपोर्ट करतो, ज्यामुळे भारतीय वापरकर्त्यांसाठी पेमेंट प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे.

सबसक्रिप्शन घेण्यासाठी

  1. ChatGPT अकाउंटमध्ये लॉग इन करा.

  2. प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा.

  3. “अपग्रेड प्लॅन” वर टॅप करा आणि Try GO पर्याय निवडा.

  4. क्रेडिट कार्ड किंवा UPI द्वारे पेमेंट करून सबस्क्रिप्शन खरेदी करा.

सबस्क्रिप्शन खरेदी केल्यानंतर, वापरकर्ते हवे असल्यास कधीही प्लॅन रद्द करू शकतात.

ChatGPT Cheapest Plan
Goa Slums: गोव्यात 14 झोपडपट्ट्यांत सुमारे 27 हजार लोक! 2011ची आकडेवारी; संख्‍या बरीच मोठी असण्‍याची शक्‍यता

GPT-4o आणि Sora व्हिडिओ निर्मिती साधने ChatGPT Go प्लॅनमध्ये उपलब्ध नसतील. ही फीचर्स फक्त ChatGPT Plus सबस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहेत, ज्यासाठी दरमहा १९९९ रुपये खर्च करावे लागतात, तर प्रो व्हेरिएंटसाठी हा खर्च १९,९०० रुपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com