
Chandra Grahan 2025 date and time: या वर्षीचे दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण ७ सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. हे एक महत्त्वाचे खगोलीय आणि धार्मिक महत्त्व असलेले ग्रहण आहे. हे चंद्रग्रहण 'ब्लड मून' म्हणून ओळखले जाते, कारण यावेळी चंद्र लालसर रंगाचा दिसेल. भारतात हे ग्रहण पूर्णपणे दिसणार असल्यामुळे याचे धार्मिक महत्त्व अधिक आहे आणि याचा 'सूतक काळ' भारतात पाळला जाईल.
या चंद्रग्रहणाची सुरुवात ७ सप्टेंबर रोजी रात्री ०९ वाजून ५७ मिनिटांनी होईल आणि मध्यरात्री ०१ वाजून २६ मिनिटांनी याची समाप्ती होईल. ग्रहणाचा एकूण कालावधी ३ तास, २९ मिनिटांचा असेल. विशेषतः रात्री ११ वाजल्यापासून ते मध्यरात्री १२ वाजून २२ मिनिटांपर्यंत हे ग्रहण आपल्या पूर्ण शिखरावर असेल.
धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहणापूर्वी 'सूतक काळ' सुरू होतो. या ग्रहणाचा सूतक काळ ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजून ५७ मिनिटांनी सुरू होईल आणि ग्रहण समाप्त झाल्यावरच तो संपेल. सूतक काळात मंदिरांचे दरवाजे बंद ठेवले जातात आणि कोणतेही धार्मिक विधी केले जात नाहीत.
धार्मिक मान्यतेनुसार, चंद्रग्रहणाच्या वेळी काही गोष्टी करणे टाळावे. या काळात अन्न शिजवणे किंवा खाणे योग्य मानले जात नाही. तसेच, सुई, कात्री किंवा चाकू यांसारख्या तीक्ष्ण वस्तूंचा वापर करणे टाळावे. ग्रहणाच्या काळात पूजा-पाठ करण्याची परवानगी नसते. गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये, असाही एक समज आहे. मात्र, ग्रहणाच्या वेळी मंत्रांचा जप करणे शुभ मानले जाते.
हे चंद्रग्रहण भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिजी बेटे आणि अमेरिका, तसेच अंटार्क्टिकाच्या काही भागांमध्ये दिसेल. भारतात हे ग्रहण दिल्ली, मुंबई, कोलकाता, पुणे, लखनऊ, हैदराबाद आणि चंदीगढ यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये स्पष्टपणे पाहता येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.