Pramod Yadav
येत्या २०२५ वर्षात दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण दिसणार आहेत. या ग्रहणांची माहिती आपण घेणार आहोत.
२०२५ मधील पहिले सूर्यग्रहण २९ मार्च रोजी दिसणार आहे. हे आंशिक सूर्यग्रहण भारत वगळता आशिया, आफ्रिका आणि रशियात पाहता येईल.
वर्षातील दुसरे सूर्यग्रहण २१ सप्टेंबर २०२५ रोजी पाहता येईल, हे देखील आंशिक सूर्यग्रहण असेल आणि हे देखील भारतात दिसणार नाही.
२०२५ वर्षातील पहिले चंद्रग्रहण १४ मार्च रोजी पाहता येईल, हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही.
७ सप्टेंबर रोजी वर्षातील दुसरे चंद्रग्रहण दिसणार आहे. विशेष बाब म्हणजे दोन्ही चंद्रग्रहण आंशिक असतील.
पृथ्वी ज्यावेळेला सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि काही काळ सरळ रेषेत येतात. या स्थितीला चंद्रग्रहण म्हणतात.
तसेच, सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये चंद्र सरळ रेषेत येतात त्यावेळी चंद्रामागे सूर्य झाकल्याने सूर्याला ग्रहण लागते.