Viral Video: भारताच्या 'विराट' विजयाचा जल्लोष पाकिस्तानातही, 'कोहली-कोहली'च्या घोषणा

India vs Pakistan: रविवारी (23 फेब्रुवारी) भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या पाकिस्तानसोबत हाय व्होल्टेज सामना झाला.
India vs Pakistan
India vs PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

India vs Pakistan, Champions Trophy 2025

दुबई येथे क्रिकेटचा रणसंग्राम अर्थात 'चॅम्पियन ट्रॉफी' स्पर्धा सुरू आहे. रविवारी (23 फेब्रुवारी) भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या पाकिस्तानसोबत हाय व्होल्टेज सामना झाला. पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करत भारताला माफक आव्हान दिलं होतं. भारतानं चार गडी गमावून हा सामना सहज जिंकला.

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध शानदार खेळी केली. त्याने त्याच्या कारकिर्दीतील 51 वे शतक झळकावले आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

टीम इंडियाच्या विजयानंतर देशभरातील सर्व चाहत्यांनी आनंदाने जल्लोष केला. भारताच्या विजयाचा आनंद शेजारील देश पाकिस्तानमध्येही साजरा करण्यात आला. पाकिस्तानमध्ये कोहली-कोहलीच्या घोषणा देण्यात आल्या. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

India vs Pakistan
India vs Pakistan: भारताचा पाकिस्तानवर एकतर्फी विजय! विराट कोहलीसह 'हे' खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार

कोहली-कोहलीच्या घोषणा

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, अनेक लोक मोठ्या स्क्रीनसमोर भारत-पाकिस्तान सामना लाईव्ह पाहत आहेत. विराट कोहलीने भारतासाठी विजयी चौकार मारताच, तिथे उपस्थित असलेले सर्वजण आनंदाने उफाळून येतात.

यासोबतच कोहली-कोहलीच्या घोषणा सुरू होतात. व्हायरल व्हिडिओ पाकिस्तानचा असल्याचा दावा केला जात आहे.

शानदार शतक

विराट कोहलीला मोठ्या सामन्यांचा खेळाडू म्हटलं जातं आणि वेळोवेळी त्यानं हे सिद्ध केलं आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शानदार शतक झळकावले आणि त्याच्या कारकिर्दीत 14 हजार एकदिवसीय आंतरराष्ट्रीय धावाही पूर्ण केल्या.

कोहलीने आतापर्यंत खेळलेल्या 287 एकदिवसीय डावांमध्ये 14,085 धावा केल्या आहेत. सचिनचा विक्रम मोडत तो हा टप्पा गाठणारा सर्वात जलद खेळाडूही बनला आहे.

India vs Pakistan
India vs Pakistan: 'भारत हरणार' म्हणणारा IIT बाबा तोंडघशी, भविष्यवाणी ठरली खोटी, नेटिझन्सनी घेतली फिरकी

पाकिस्तान चॅम्पियन ट्रॉफीमधून बाहेर?

भारताविरुद्ध झालेल्या पराभवामुळं पाकिस्तानी संघाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यता खूपच कमी झाली आहे. मात्र पाकिस्तान संघ स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर पडलेला नाही.

आज सोमवारी (24 फेब्रुवारी) रावळपिंडी इथं न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. जर न्यूझीलंड संघ बांगलादेशविरुद्ध जिंकला तर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com