Travel Advisory: भारतीयांनी इराण आणि इस्रायलला जाऊ नये... युद्धाच्या सावटादरम्यान परराष्ट्र मंत्रालयाची ॲडव्हायजरी जारी!

Travel Advisory: इराणच्या या धमकीच्या पाश्वभूमीवर भारत सरकारने भारतीय नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली आहे.
 Israel Iran Tensions:
Israel Iran Tensions: Dainik Gomantak
Published on
Updated on

MEA Travel Advisory On Israel and Iran Tension: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. मागील काही दिवसांपासून युद्धाने अधिक आक्रमक रुप धारण केले आहे. यातच, इस्त्रायल सीरियातील इराणच्या ठिकाणांना लक्ष्य करत आहे. अलीकडेच इस्रायलने सीरियातील इराणच्या राजनैतिक कार्यालयावर मोठा हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणच्या सर्वोच्च जनरलसह 12 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर इराणने बदला घेण्याची धमकी देत ​​इस्रायलवर हल्ला केला जाईल, असे म्हटले आहे. इराणच्या या धमकीच्या पाश्वभूमीवर भारत सरकारने भारतीय नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, ''या प्रदेशातील सध्याची परिस्थिती पाहता, पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व भारतीयांना इराण किंवा इस्रायलला प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासोबतच इस्रायल किंवा इराणमध्ये राहणाऱ्या लोकांनी तेथील भारतीय दूतावासांशी संपर्क साधून आपली नोंदणी करुन घ्यावी. आपल्या सुरक्षिततेबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगा.''

 Israel Iran Tensions:
Israel Iran Tensions: इराणच्या धमकीने महासत्तेला धास्ती! अमिरेकन नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी; इस्त्रायलाही अलर्ट

दरम्यान, अनेक दशकांपासून कट्टर प्रतिस्पर्धी असलेले इराण आणि इस्रायल आमनेसामने आहेत. दूतावासावरील हल्ल्यानंतर इराण युद्धासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. इराण या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरत आहे, तर इस्रायलने हा हल्ला आपण केला नसल्याचे म्हटले आहे. येत्या 24 ते 48 तासांत इराण इस्रायलवर हल्ला करु शकतो, असे मानले जात आहे. 1 एप्रिल रोजी दूतावासावर झालेल्या हल्ल्यात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे कमांडर आणि त्याचे अनेक सदस्य मारले गेले होते. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला होता.

इराण इस्रायलच्या सीमांना लक्ष्य करु शकतो

विदेशी मीडिया वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, इराण सर्वप्रथम इस्रायलच्या सीमांना लक्ष्य करु शकतो. सध्या दोन्ही देशांचे सैन्य पूर्ण अलर्ट मोडवर आहे. इराणकडून हल्ला होण्याची शक्यता पाहता अमेरिकाही सतर्क आहे. इराणमध्ये हा हल्ला झाला तेव्हा तेथील राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ असे सांगितले होते. या हल्ल्यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या सात अधिकाऱ्यांसह 12 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये वरिष्ठ जनरल मोहम्मद रझा जाहेदी आणि त्यांचे उपनियुक्त यांचा समावेश होता.

 Israel Iran Tensions:
Israel-Iran Tensions: सीरियातील इराणी दूतावासावर इस्रायलचा हवाई हल्ला; इराणच्या सर्वोच्च लष्करी कमांडरसह 6 जण ठार

कोण किती शक्तिशाली आहे?

शस्त्रास्त्रांच्या बाबतीत इस्रायलला इराणपेक्षा अधिक शक्तिशाली मानले जाते. इस्रायलकडे 600 हून अधिक विमाने आहेत. इराणकडे 541 विमाने आहेत. लढाऊ विमानांबद्दल बोलायचे झाल्यास, इस्रायल इराणच्या पुढे आहे. इस्रायलकडे 341 तर इराणकडे 200 फायटर प्लेन आहेत. इस्रायलकडे 48 अटॅक हेलिकॉप्टर आहेत तर इराणकडे फक्त 12 लढाऊ हेलिकॉप्टर आहेत. रणगाड्यांबाबत बोलायचे झाल्यास इराण इस्रायलपेक्षा वीस पटीने पुढे आहे. इस्रायलकडे सुमारे 2200 रणगाडे आहेत तर इराणकडे 4071 रणगाडे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com