अत्यल्प पैशात खुप काही मिळू शकते. अथवा जाहिरात करायची एका उत्पादनाची आणि विक्री मात्र दुसऱ्याच उत्पादनाची करायची अशा प्रकारे ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर आता लगाम लागण्याची शक्यता आहे. कारण अशा जाहिरातींवर आळा बसावा यासाठी केंद्र सरकारने नवी नियमावली आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये लहान मुलांसाठी असलेल्या जाहिरातींचाही समावेश आहे. (The central government will control advertisements that mislead consumers )
मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने याबाबत स्पष्टीकरण देताना जाहिरात प्रसिद्ध अथवा प्रसारीत करण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. ग्राहक संरक्षण खात्याने आता 'सरोगेट' जाहिरातींवरदेखील चाप लावला आहे. जाहिरातींमध्ये अधिक पारदर्शकता आणण्याचे निर्देश केंद्र सरकारने आदेश दिले आहे. तसेच नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. तसेच अशा प्रकारच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींना ही अशा जाहिरात केली असल्यास कारवाईला सामोर जावे लागणार आहे.
ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी सांगितले की, जाहिरातींकडे ग्राहक अधिक आकर्षित होतात. त्यामुळे सरकारने निष्पक्ष जाहिरातींसाठी काही मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत. या नव्या नियमांचे पालन न झाल्यास ग्राहक संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. हे नियम प्रिंट, टीव्ही आणि डिजीटल प्लॅटफॉर्मसाठी लागू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरोगेट जाहिरात या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती असतात. यामध्ये एका उत्पादनाची प्रतिमा दाखवून इतर उत्पादनाची जाहिरात केली जाते. उदाहरणार्थ सोडा वॉटरच्या जाहिराती आडून मद्याची जाहिरात केली जाते. त्याशिवाय, वेलचीच्या आडून गुटखा उत्पादनाची जाहिरात केली जाते. अशा जाहिरातींना सरोगेट जाहिरात म्हणतात. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, उत्पादन अथवा सेवांची जाहिरात करणारे चित्रपट अथवा अन्य क्षेत्रातील सेलिब्रेटीदेखील जबाबदार असल्याचे समजले जाणार आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.