8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 8 व्या वेतन आयोगाआधी 'महागाई भत्त्या'त दोनदा होणार वाढ

8th Pay CommissionLatest Update: आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची प्रतीक्षा करत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
8th Pay Commission
8th Pay CommissionDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची प्रतीक्षा करत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. वेतन आयोगाची अंमलबजावणी होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात (DA) दोनदा वाढ मिळण्याची शक्यता आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार असून, या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महागाई भत्ता ६३ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता

सध्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ६० टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. ताजी आकडेवारी आणि 'ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स' (AICPI-IW) मधील वाढ पाहता, जुलै २०२६ पासून डीए मध्ये ३ टक्क्यांनी वाढ होऊन तो ६३ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महागाईचा दर विचारात घेता, सरकार सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात या वाढीची अधिकृत घोषणा करू शकते. तसेच, पुढील सहामाहीसाठी (जानेवारी ते जून २०२७) डीए वाढीची घोषणा मार्च किंवा एप्रिल २०२७ पर्यंत अपेक्षित आहे.

8th Pay Commission
Goa Education: गोव्याचा स्थानिक वारसा आता अभ्यासक्रमात, NEP-अनुरूप पाठ्यपुस्तकांची सर्व वर्गांत अंमलबजावणी

८ व्या वेतन आयोगाच्या कामाचा वेग वाढला

केंद्र सरकारने ८ व्या वेतन आयोगाच्या शिफारशींसाठी १८ महिन्यांचा कालावधी निश्चित केला आहे, जो २०२७ च्या पहिल्या सहामाहीत संपणार आहे. वेतन आयोगाने आपली प्रक्रिया अधिक वेगवान केली आहे.

कर्मचाऱ्यांच्या संघटना आणि संबंधित संस्थांकडून सूचना व मेमोरेंडम स्वीकारण्याची अंतिम मुदत १५ जून २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. आयोगाने स्पष्ट केले आहे की, यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही. या प्रक्रियेनंतर जुलै महिन्यात कोलकात्यामध्ये विविध कर्मचारी संघटनांसोबत क्षेत्रीय बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे.

8th Pay Commission
इन्स्टाग्रामवरची मैत्री अंगलट; अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला!

कर्मचाऱ्यांच्या आर्थिक लाभावर परिणाम

आठव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा लांबली असली तरी, दोनदा होणारी डीए वाढ कर्मचाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. महागाईच्या सध्याच्या दरांचा विचार करता, ही वाढ कर्मचाऱ्यांच्या खिशाला मोठा दिलासा देणारी असेल. केंद्र सरकारचा या वाढीबाबतचा अंतिम निर्णय मे आणि जून २०२६ च्या महागाईच्या आकडेवारीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीने घेतला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com