
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी डिजिटल इंडिया मोहिमेला यंदा १० वर्षे पूर्ण झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर, १ जुलै २०१५ रोजी डिजिटल इंडिया कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. शात डिजिटल क्रांती घडवणाऱ्या या उपक्रमाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त सरकारने नागरिकांसाठी खास स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे नाव आहे ‘डिजिटल इंडियाचा दशक - रील स्पर्धा’.
देशभरातील नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून, डिजिटल इंडियामुळे त्यांच्या जीवनात घडलेल्या सकारात्मक बदलांची रील तयार करून ती शेअर करण्याची संधी यामधून दिली जात आहे.
टॉप १० विजेते — प्रत्येकी १५,००० रुपये
पुढील २५ विजेते — प्रत्येकी १०,००० रुपये
पुढील ५० विजेते — प्रत्येकी ५,००० रुपये
रील किमान १ मिनिटाची असावी.
ती पूर्णपणे मूळ (Original) असावी आणि यापूर्वी कोणत्याही सोशल मीडियावर अपलोड केलेली नसावी.
हिंदी, इंग्रजी किंवा कोणत्याही स्थानिक भाषेत बनवलेली असू शकते.
रील पोर्ट्रेट मोडमध्ये आणि MP4 फॉरमॅटमध्ये असावी.
डिजिटल इंडियामुळे तुमच्या जीवनात घडलेला बदल.
ऑनलाइन सरकारी सेवा, डिजिटल शिक्षण, हेल्थकेअर सुविधा, आर्थिक सक्षमीकरण यामुळे नागरिकांना झालेला लाभ.
डिजिटल तंत्रज्ञानाने नागरिकांना कसे सक्षम केले, याचा अनुभव.
https://www.mygov.in/task/decade-digital-india-reel-contest/
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.