Khan Sir: असे कोणते आरोप आहेत, ज्यामुळे खान सरांना बसला ५ लाखांचा दंड

Khan Sir Fine: खान सर, पाटणा, बिहार येथील, यूट्यूबवरील प्रसिद्ध शिक्षकांपैकी एक आहेत. खान जीएस रिसर्च सेंटर हे त्यांचे चॅनल लोकप्रिय आहे. त्याचे जवळपास 1.45 कोटी फॉलोअर्स आहेत.
Khan Sir Fined By The Central Consumer Protection Authority.
Khan Sir Fined By The Central Consumer Protection Authority.DAINIK GOMANTAK
Published on
Updated on

Central Consumer Protection Authority has fined Khan Sir Rs 5 lakh for misleading advertisements and unfair trade practices: आज देशातील प्रसिद्ध शिक्षकांपैकी एक असलेल्या खान सरांच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे. कारण केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने खान स्टडी ग्रुपला दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि अनुचित व्यापार पद्धतींबद्दल 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्य आयुक्त निधी खरे आणि अनुपम मिश्रा यांनी हा निर्णय घेतला आहे.

दरवर्षी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) च्या नागरी सेवा परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर, विविध कोचिंग संस्था जाहिराती जारी करतात.

ज्यात यशस्वी उमेदवारांना त्यांचे विद्यार्थी म्हणून आमंत्रित केले जाते. यासाठी यशस्वी उमेदवारांची छायाचित्रे वापरली जातात. या संस्था उमेदवारांसाठी अभ्यासक्रम आणि त्यांच्या शुल्काचा उल्लेख करत नाहीत.

यावेळी सीसीपीएने अशा संस्थांना नोटिसा बजावल्या होत्या, त्यात खान सरांचाही सहभाग होता. UPSC नागरी सेवा परीक्षा 2022 साठी निवडलेल्या 933 पैकी 682 हे त्यांचे विद्यार्थी असल्याचा दावा त्यांनी केला होता.

पहिले पाच उमेदवार केएसजीचे असल्याचा दावा त्यांनी केला. यामध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या इशिता किशोरचा समावेश आहे. यशस्वी उमेदवारांनी निवडलेल्या अभ्यासक्रमाची माहिती जाहिरातींमध्ये देण्यात आली नसल्याचे तपासात समोर आले आहे.

Khan Sir Fined By The Central Consumer Protection Authority.
क्रिप्टो करन्सी, फॉरेक्स ट्रेडिंग'च्या नावाखाली 2,500 कोटींची फसवणूक; गोवा, गुजरातसह विविध राज्यात जाळे
Khan Sir Fined By The Central Consumer Protection Authority.
Parliament Winter Session 2023: संसदेचे हिवाळी अधिवेशन 04 डिसेंबरपासून, अनेक विधेयके मंजूर होण्याची शक्यता

खान सर त्यांच्या शिकवण्याच्या शैलीमुळे सतत वादात सापडत असतात. याआधीही पंक्चर बनवणे, फ्रान्सच्या पाकिस्तानातील राजदूताला हद्दपार करण्यामागचे रहस्य उलगडणे आणि विशिष्ट समुदाय अधिक मुले जन्माला घालत असल्याबाबत भाष्य करणे यामुळे ते वारंवार चर्चेत होते. त्यानंतरही त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी होत होती.

या सर्वात, खान सरांचे खरे नाव काय आहे? हे आतापर्यंत एक कोडेच राहिले आहे. ते त्यांचे पूर्ण नावे कधीच सांगत नाहीत.

काही लोक त्याचे नाव फैसल खान असल्याचे म्हणतात तर काहीजण ते अमित सिंह असल्याचा दावा करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com