​CBSE Board Exam: सीबीएसई परीक्षांच्या तारखा जाहीर, असे डाऊनलोड करा वेळापत्रक

सीबीएसईच्या दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.
​CBSE Board Exam
​CBSE Board ExamDainik Gomantak
Published on
Updated on

नवीन वर्षाच्या आगमनानंतर परीक्षांचा काळ सुरु होतोय. सीबीएसईच्या दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधी दरम्यान होणार आहेत तर बारावीच्या परीक्षा या 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिलदरम्यान होतील. बोर्डाने काल परिपत्रक जाहीर करत ही माहिती दिली. दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधी दरम्यान होणार आहेत. तर बारावीच्या परीक्षा या 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिलदरम्यान होतील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून cbse.gov.in या संकेतस्थळावर वेळापत्रक देखील देण्यात आलंय.

सीबीएसईच्या (CBSE) साली जवळपास 35 लाख विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीची परीक्षा दिली होती. कोरोना काळात गेल्या वर्षी सीबीएसईनं परीक्षा दोन टर्ममध्ये घेतल्या होत्या. यंदा मात्र तसं होणार नसून परीक्षा एकाच टर्ममध्ये घेतली जाणार आहे. गेल्यावर्षी बारावीमध्ये एकूण 92.71 टक्के तर दहावी मध्ये 94.40 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

​CBSE Board Exam
Heeraben Modi Passed Away : पंतप्रधान मोदींना मातृशोक; हिराबेन यांचं निधन

असे डाऊनलोड करा परीक्षेचे वेळापत्रक-

वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी cbse.gov.in य संकेतस्थळाला भेट द्यावी

दहावी, बारावी परीक्षा शेड्युल 2023 वर क्लिक करावे

त्यानंतर दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या दोन वेगवेगळ्या पीडीएफ तुम्हाला स्क्रिनवर दिसतील

दहावी, बारावी परीक्षेची डेटशीट डाऊनलोड करावी

​CBSE Board Exam
Heeraben Modi Passes Away : हिराबेन मोदी यांच्या निधनावर विविध स्तरातून शोक व्यक्त

दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या 2 जानेवारी ते 14 जानेवारी 2023 दरम्यान इयत्ता दहावी (CBSE 10th Exams) आणि बारावीसाठी (CBSE 12th Exams) प्रॅक्टिकल परीक्षा घेणार आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा वेळेवर पूर्ण करण्याचं आवाहन बोर्डानं शाळांना केलं आहे. बोर्डानं प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित करण्यासाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (SoP) आणि मार्गदर्शक तत्त्वं देखील जारी केली आहेत. प्रॅक्टिकल परीक्षेला विद्यार्थी गैरहजर राहिल्यास निकालात विद्यार्थी गैरहजर असल्याचं नोंदवण्यात यावं आणि एखाद्या विद्यार्थ्याची प्रॅक्टिकल परीक्षा इतर कोणत्याही तारखेला घेतली जाणार असेल तर त्याची 'अनुपस्थित' ऐवजी 'रीशेड्यूल' अशी नोंद केली जावी, असंही बोर्डानं म्हटलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com