Cartoonist Irfan: 'लग गया तो तीर, नहीं तो तुक्का'!

जेडीयूने उत्तर प्रदेशमधील आपल्या उमेदवारांच्या यादी सादर केली, ज्यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे नाव नाही. याच मुद्द्यावरती आधारीत, सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार इरफानने आज एक व्यंगचित्र काढले आहे.
Nitish Kumar Cartoon
Nitish Kumar CartoonDainik Gomantak
Published on
Updated on

जनता दल युनायटेड (JDU) उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करत आहेत, परंतु नितीश कुमार त्यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) येणार नाहीत. खरेतर, जेडीयूने उत्तर प्रदेशमधील आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी यादी आयोगाकडे सादर केली आहे, ज्यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांचे नाव नाहीये. याच मुद्द्यावरती आधारीत, सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार (Cartoon) इरफानने आज एक व्यंगचित्र काढले आहे.

Nitish Kumar Cartoon
Beating retreat 2022: 1000 ड्रोनने उजळले आकाश

खरे तर, व्यंगचित्रकार इरफानने आपल्या व्यंगचित्रात असे म्हटले आहेत की, नितीश कुमार यांना उत्तर प्रदेशात त्यांच्या पक्षांचा प्रचार करणे खूप अवघड जात आहे. त्यावर ते म्हणतात की, "हम ही से प्यार, हम ही से लढा" ही गोष्ट प्रेम करणाऱ्यांना लागू पडो किंवा न पडो, पण रोज राजकारण करणाऱ्यांना ती लागू पडते.

नितीश कुमार उत्तर प्रदेशात आपला उमेदवार उभा करत आहेत, पण प्रचाराला मात्र येणार नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. यावर ते म्हणाले की, नितीशकुमार आता उत्तर प्रदेशात आले तरी बिहार आणि केंद्रात उत्तर प्रदेशातील भाजप सरकारसोबतच्या युतीत सहभागी आहेत, त्यामुळे त्यांना ईथे येणे शक्य होत नाही.

Nitish Kumar Cartoon
उत्तराखंड, पंजाब आणि गोवा निवडणुकीपूर्वीच 'हा' मोठा सर्व्हे आला समोर

उत्तर प्रदेशमध्ये नितीश कुमारही प्रचारासाठी येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. खरं तर, जेडीयूने काल स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली, ज्यामध्ये नितीश कुमार आणि आरसीपी सिंह यांच्या नावाचा देखील समावेश नव्हता. आत्तासाठी, नितीश कुमार आणि आरसीपी सिंह यांना स्टार प्रचारकांमध्ये जोडले जाऊ शकते, ज्याबद्दल आज औपचारिक घोषणा देखील केली जाऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com