Record sales of TVs, Cricket World Cup has left behind the tradition of not buying new items during the Pitru Paksha period: भारतात क्रिकेट हा धर्म असेल तर विश्वचषक हा सर्वात आनंदाचा सण आहे. क्रिकेट चाहत्यांच्या उत्साहाने पितृपक्षाच्या कालावधीत नव्या वस्तूंची खरेदी न करण्याची पारंपरा मागे पडली आहे.
आणि ब्लॉकबस्टर भारत-पाकिस्तान सामना जसा-जसा जवळ येत आहे तशी-तशी नवीन टीव्ही, विशेषतः मोठ्या स्क्रीनच्या टिव्हींची विक्री नवीन शिखरे गाठत आहे.
Samsung, Xiaomi, Sony, LG आणि Panasonic सारख्या कंपन्यांनी पितृपक्षादरम्यान बंपर विक्री नोंदवली आहे.
बर्याच कंपन्या आणि ऑनलाइन विक्रेत्यांनी या वर्षाच्या नियोजित वेळेपेक्षा आधी 'फेस्टीव्हल सेल' सुरू केला होता. क्रिकेटच्या विश्वचषकाचा फायदा उठवत ते भरपूर फायदा मिळवत आहेत.
आगामी सणासुदीच्या काळात ही स्थिती कायम राहिल्यास नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत देशभरातील टिव्हीटा स्टॉक संपू शकतो असे अनेक कंपन्यांच्या व्यवस्थापनाने सांगितले आहे.
यंदाच्या क्रिकेट विश्वचषकात यजमान भारतीय संघ विजेतेपदाचा प्रमुख दावेदार आहे. तसेच शनिवारी या स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान यांच्यात लढत होत असल्याने भारतीय चाहत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
समोर आलेल्या आकडेवारीनुसार गेल्य वर्षी पितृपक्षाच्या कालावधीत झालेल्या ५५-इंच आणि त्याहून अधिक आकाराच्या टीव्हीच्या विक्रीपेक्षा, यंदा विश्वचषकामुळे २-२.५ पटीने जास्त आहे.
ग्राहकांच्या घरी टीव्ही पोहचण्यापूर्वीच ते इंस्टॉल केले जातील याची खात्री करण्यासाठी कंपन्या अतिरिक्त काळजी घेत आहेत. “लोक उत्साहित आहेत आणि विश्वचषक सुरू असल्याने ताबडतोब टिव्ही इंस्टॉल करण्याची मागणी मोठी आहे.
भारतीय ग्राहक टिव्ही खरेदीसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन (online shopping) असे दोन्ही मोड वापरत असून दोन्हीमध्ये मोठी मागणी आहे.
सध्या देशातील सणासुदीचा कालावधी आणि क्रिकेट विश्वचषकचा ज्वर यांच्या संयोगाने टिव्ही विक्रीत सकारात्मक वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे क्रिकेट विश्वचषकामुळे (Cricket World Cup 2023) ग्राहक मोठ्या स्क्रीन आकाराकडे आकर्षित होत आहेत. यामध्ये 75-इंच आणि 85-इंच स्क्रीन अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.