Mumbai: विमानात पुन्हा गैरप्रकार, स्वीडिश नागरिकाने केला केबिन क्रूचा विनयभंग

विमान मुंबई विमानतळावर उतरल्यावर विमान कर्मचाऱ्यांनी त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले.
Indigo Flight
Indigo Flight Dainik Gomantak
Published on
Updated on

बँकॉकहून मुंबईत येणाऱ्या स्वीडिश नागरिकाने केबिन क्रू सदस्याचा विनयभंग केला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या 63 वर्षीय स्वीडिश नागरिकाला गुरुवारी मुंबईत अटक करण्यात आली. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत बातमी दिली आहे.

क्लास एरिक हॅराल्ड जोनास वेस्टबर्ग असे या आरोपीचे नाव असून, विमान मुंबई विमानतळावर उतरल्यावर विमान कर्मचाऱ्यांनी त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले.

विमानात जेवण दिले जात असताना या प्रवाशाने कथित गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. फ्लाइट लँड होईपर्यंत तो अशाप्रकारे गैरवर्तन करत होता अशी माहिती समोर आलीय. दरम्यान, पीडीत 24 वर्षीय केबिन क्रूने कॅप्टनला याप्रकरणाची माहिती दिली.

स्वीडिश आरोपीला विमानात सीफूड नसल्याचे सांगितल्यानंतर सर्व प्रकार सुरू झाला. मी त्याला चिकन दिले आणि POS मशीनद्वारे पैसे भरण्यासाठी त्याचे एटीएम कार्ड मागितले. कार्ड स्वाइप करण्याच्या बहाण्याने प्रवाशाने माझा हात धरला. मी त्याला झटकले आणि कार्डचा पिन टाकण्यास सांगितले. दरम्यान, यावेळी त्याने मर्यादा ओलांडली...आणि उठून सर्वांसमोर माझा विनयभंग केला." असे पीडीत महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

Indigo Flight
गोवा, कोची नेव्हल एअरक्राफ्ट यार्ड्सचे होणार आधुनिकीकरण; संरक्षण मंत्रालयाचा 470 कोटी रुपयांचा करार

संशयित स्वीडिश नागरिक आजारी असून, त्याचे शरीर थरथरते. तो इतरांच्या मदतीशिवाय काहीही करू शकत नाही. त्याने केबिन क्रूला स्पर्श केल्यावर त्याने POS पेमेंट कार्ड मशीन धरून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याने तिला जाणूनबुजून स्पर्श केला नाही," असे आरोपीच्या वकिलाने म्हटले आहे.

दरम्यान, विमानात गैरप्रकार होण्याच्या घटना काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. गोवा, कोची नेव्हल एअरक्राफ्ट यार्ड्सचे होणार आधुनिकीकरण; संरक्षण मंत्रालयाचा 470 कोटी रुपयांचा करार

सुरूवातील विमानात महिलेवर मृत्रविसर्जन केल्याची घटना घडली होती. त्यानंतर असे दोन ते तीन प्रकार समोर आले होते. त्यानंतर स्वीडिश नागरिकाने केलेल्या घटनेमुळे खळबळ निर्माण झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com