'लिंग बदल' करून 4 पुरुष बनले महिला, करत होते वेश्याव्यवसाय

लिंग बदलून 4 पुरुष बनलेल्या महिला स्पाच्या नावाखाली शरीरसंबंधाचा धंदा करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली
prostitution
prostitution Dainik gomantak
Published on
Updated on

दोन दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता. ज्यामध्ये अनेक परदेशी तरुणींनाही अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास केल्यानंतर पोलिसांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. पोलिसांनी सांगितले की, अॅटम स्पा सेंटरमधून 10 मुली आणि 8 मुलांना अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये 7 मुली थायलंडच्या होत्या, परंतु त्यापैकी चार मुलींनी त्यांचे लिंग बदलले होते. अन्य तिघांच्या पासपोर्टची माहिती गोळा करण्यात येत आहे.

लिंग बदलून 4 पुरुष बनलेल्या महिला स्पाच्या नावाखाली शरीरसंबंधाचा धंदा करत असल्याची माहिती इंदूर गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावर महिला पोलीस (police) आणि गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत 18 मुला-मुलींना घटनास्थळी अटक केली. ज्यामध्ये 10 मुली आणि 8 मुले होती. स्पा सेंटर ऑपरेटर संजयने पोलिसांना सांगितले की, त्याने अॅटम स्पाची फ्रँचायझी घेतली आहे

prostitution
Afghanistan: महिलांना हिजाब घालणं झालं बंधनकारक, तालिबानने काढला फर्मान

याआधी त्यांनी स्वत:ला स्पा व्यवस्थापक असल्याचे सांगितले होते. लिंग बदलल्यानंतर वेश्याव्यवसाय करणाऱ्या ज्योती शर्माच्या म्हणण्यानुसार, थायलंडमधून 7 मुली आल्या आहेत, त्यापैकी फक्त 4 थायलंडचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. या मुली स्पा सेंटरमध्ये लिंग बदलून सेक्स वर्क करत होत्या. सध्या पोलीस सर्व आरोपींना न्यायालयात (Court) हजर करून संजयची पोलीस कोठडी मागणार असून त्याची कसून चौकशी करणार आहेत.

prostitution
स्त्री-पुरुष समानता आणण्यासाठी शाळेमध्ये 'सर-मॅडम' म्हणण्याच्या प्रथेवर बंदी

कोर्टात हजर झाल्यानंतर पोलिस रिमांड मागणार, दोन महिन्यांपूर्वी बांगलादेशातून मुलींना येथे वेश्याव्यवसायासाठी आणणाऱ्या दलालाला इंदूरच्या विजयनगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली होती. दोन मुली आणि 4 जणांनाही पकडले. दलालने चौकशीदरम्यान सांगितले होते की, तो बांगलादेशातून (Bangladesh) मुलींना इंदूरला आणायचा आणि इतर भागात पुरवायचा. याआधीही इंदूरच्या अनेक भागातून अशा धंद्याचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी पोलीस चोख काम करत आहेत. अशा प्रकरणात पकडलेल्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com