Businessman Gopal Khemka Murder Case
Businessman Gopal KhemkaDainik Gomantak

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

Businessman Gopal Khemka Murder Case: दबा धरुन बसलेल्या गुंडांनी गोपाळ खेमका यांना गाडी उतरल्यानंतर गोळ्या घालून ठार केले.
Published on

बिहारची राजधानी पाटणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. खेमका कारमधून उतरून अपार्टमेंटमध्ये प्रवेश करत असताना शुक्रवारी (०४ जुलै) रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. दबा धरून बसलेल्या गुन्हेगारांनी खेमका यांच्यावर गोळीबार करुन घटनास्थळावरुन पळ काढला.

उद्योगपती गोपाल खेमका यांना गोळी लागल्यानंतर ते खाली पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. व्यापारी खेमक यांच्या हत्येचा कट बेउर तुरुंगात रचला गेल्याची माहिती समोर आली असून, पाटणा पोलिसांची विविध पथके सध्या तुरुंगात छापा टाकत आहेत.

Businessman Gopal Khemka Murder Case
Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

खेमका यांच्या हत्येच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. खेमका यांना गोळा झाडून गुन्हेगार घटनास्थळापासून फरार झाल्याचे व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे. सध्या पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत आणि मारेकऱ्यांच्या शोधात अनेक ठिकाणी छापे टाकले जात आहेत.

या घटनेची गंभीर दखल बिहारच्या मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी घेतली आहे. खेमका यांची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना माफ केले जाणार नाही व त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री चौधरी म्हणाले.

Businessman Gopal Khemka Murder Case
Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

कायदा हातात घेणाऱ्यांना पोलिस सोडणार नाहीत. शिवाय ज्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली त्यांना देखील सोडले जाणार नाही, असे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्पष्ट केल्याचे चौधरी म्हणाले. या घटनेचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली असून, घटनेचा सखोल तपास केला जाईल, असेही चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com