Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Disneyland In Haryana India: नव्याने होणारा थीम पार्क हरियाणाच्या सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक क्षेत्रात गेम चेंजर ठरणार आहे. शिवाय देशभरातील पर्यटकांसाठी देखील आकर्षण ठरणार आहे.
Disneyland In Haryana India
Disneyland
Published on
Updated on

हरियाणा: डिस्नेलँडच्या थर्तीवर आता भारतात देखील भव्य थीम पार्क होणार आहे. हरियाणा राज्याने यासाठी मानेसर येथे ५०० एकर जागा मंजूर केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी घोषणा केली आहे. कुंडली – मानेसर – पालवल या महामार्गाच्या जवळच हे थीम पार्क उभारले जाणार आहे.

परदेशात पॅरिस, टोकयो आणि कॅलिफोर्निया सारखे पर्यटन भारतात देखील निर्माण करण्यासाठीच्या प्रयत्नाचा हा एक भाग आहे. या माध्यमातून पर्यटन यासह रोजगार निर्मिती आणि पायभूत सुविधांचा विकास होणार असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. नव्याने होणारा थीम पार्क हरियाणाच्या सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक क्षेत्रात गेम चेंजर ठरणार आहे. शिवाय देशभरातील पर्यटकांसाठी देखील आकर्षण ठरणार आहे.

Disneyland In Haryana India
Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

मानेसर येथील पाचगाव चौकात यासाठी निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा भाग गुरुग्राम येथील व्यावसायिक क्षेत्र, नियोजित १००० एकर परिसरातील ग्लोबल सिटी प्रकल्प असल्याने अधिक लाभ होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. थीम पार्कमुळे परिसराचा विकास होण्यासह त्याचे बाजारमुल्य देखील वाढणार असल्याचे मत मुख्यमंत्री सैनी यांनी व्यक्त केले आहे.

सध्या या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पण, डिस्नेकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. थीम पार्क हरियाणात झाल्यानंतर राज्यासह भारताची जागतिक पर्यटनाच्या पटलावर नव्याने ओळख निर्माण होणार आहे. तसेच, यामुळे राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यास देखील फायदा होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com