Punjab-Haryana HC: 'कुठेतरी जावून मर' म्हणणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे !

Punjab And Haryana High Court: घरगुती भांडणात असे बोलणे आत्महत्येस प्रवृत्त करणे पुरेसे नाही, असे उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान सांगितले.
Punjab And Haryana High Court
Punjab And Haryana High CourtDainik Gomantak
Published on
Updated on

Punjab And Haryana High Court: पतीला थप्पड मारल्यानंतर 'कुठेतरी जावून मर' असे म्हणणाऱ्या पत्नीची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने दिले आहेत. घरगुती भांडणात असे बोलणे आत्महत्येस प्रवृत्त करणे पुरेसे नाही, असे निरिक्षण उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान नोंदवले.

दरम्यान, बरनाळा येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने पोलिसांत तक्रार दिली होती की, 'आपल्या मुलाचे 22 मार्च 2015 रोजी लग्न झाले होते. पत्नी पदवीधर आहे, मात्र अशिक्षित पतीला ती आपल्या बरोबरीची मानत नव्हती. या कारणावरुन दोघांमध्ये रोज भांडण व्हायचं. कालांतराने दोघांमधील भांडणं वाढत गेलं. स्थिती अशी झाली की, पत्नी कधीही भांडून माहेरी जायची. नातं तुटू नये म्हणून सासरचे लोक तिला प्रत्येक वेळी समजावून घेऊन येत असत.'

Punjab And Haryana High Court
माफियाच्या आमदार मुलाला High Court ने दिला मोठा झटका, अटकपूर्व जामीन फेटाळला

दुसरीकडे, फिर्यादीत म्हटले आहे की, '28 जून 2015 रोजी मुलगा आणि सून यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. यादरम्यान सुनेने आपल्या मुलाच्या गालावर चापट मारली आणि कुठेतरी जावून मरत का नाही, असे म्हटले. यानंतर मुलाने खोलीत जाऊन आतून कडी लावली. काही वेळाने खोलीतून धूर निघत असल्याचे दिसल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. आतमध्ये मुलाने स्वतःला पेटवून घेतले होते. त्याला पतियाळा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथेच त्याचा मृत्यू झाला.'

तसेच, या प्रकरणी पोलिसांनी (Police) तपास केला आणि कनिष्ठ न्यायालयाने सुनेला दोषी ठरवून 7 वर्षांची शिक्षा आणि 1.25 लाख रुपयांचा दंड ठोठावला. शिक्षेच्या या आदेशाला सुनेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने सुनेच्या याचिकेला परवानगी देताना सांगितले की, 'या प्रकरणातील साक्षीदार हे केवळ मृताचे आई-वडील आहेत, दुसरे कोणीही नाही.'

Punjab And Haryana High Court
Uttarakhand High Court चा मोठा निर्णय, मूळ निवासी महिलांच्या 30 टक्के आरक्षणाला ब्रेक

न्यायालयाने म्हटले की, 'याचिकाकर्त्याच्या सुनेने थप्पड मारली आणि कुठे तरी जावून मर, असे गृहीत धरले तरी पतीला आत्महत्येस प्रवृत्त करणे हा गुन्हा ठरत नाही.' उच्च न्यायालयाने (High Court) सुनेची शिक्षा रद्द करत दंडाची रक्कम तिला परत करण्याचे आदेश दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com