उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत BSP आणि AIMIM च्या युतीची शक्यता
उत्तर प्रदेशमध्ये पुढच्यावर्षी विधानसभा निवडणूकीच बिगुल वाजणार आहे. परंतु उत्तर प्रदेशचे राजकीय वातावरण अनेक दिवसांपासून गरम होण्यास सुरवात झाली आहे.अनेक दिवसांपासून उत्तर प्रदेशच्या राजकारणात दवे प्रतिदावे, युती आघाड्या यांच्या चर्चा रंगात आहेत यातच आता अशी बातमी आहे की,मायावतींचा पक्ष बहुजन समाज पार्टी आणि असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष एआयएमआयएम यांची युती असू शकते अशी बातमी ससमोर येत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र मैदानात उतरू शकतात अशी शक्यता वर्तवलं जात आहे .
याबद्दल बोलताना एआयएमआयएम यूपीचे प्रदेशाध्यक्ष शौकत अली म्हणाले की, युतीबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असून लवकरच दोन्ही पक्षाचा योग्य निर्णय जाहीर होईल.
सध्या एआयएमआयएम हा पक्ष देशाच्या राजकारणात चांगली कामगिरी करताना दिसत आहे. एआयएमआयएमला म्हणावा तास विजय जरी मिळत नसला तरी मताधिक्य खेचण्यात यश मिळत असल्याचा प्रत्यय अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत आला आहे. याचा प्रत्यय नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल आणि बिहार विधानसभेतही आलाच आहे. अनेक मतदार संघात एआयएमआयएम हा पक्ष मतमोजणीत तिसऱ्या क्रमांकावर आलेला आहे याचाच अर्थ असा की या पक्षाने देशाच्या राजकारणात आपल एक स्थान निर्माण केलं आहे.
अनेक विधानसभेच्या निवडणुकीत सर्वांना चकित करणारे एआयएमआयएम यूपीमध्येही आपले भविष्य शोधत आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनीही गेल्या काही महिन्यांत वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली होती. ओम प्रकाश राजभर आणि शिवपाल यादव यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची नावे यात समाविष्ट आहेत.
याचाच अर्थ २०२२ ची उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक अनेक मुद्द्याने गाजणार हे नक्की.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.