Viral Video: हाय गर्मी! 'पापड देखील भाजून निघाला', बिकानेर सीमेवरील BSF जवानाचा व्हिडिओ व्हायरल

BSF Jawan Viral Video: बिकानेरमध्ये 47 अंश सेल्सियस तापमान असल्याचा दावा केला आहे.
BSF Jawan Viral Video
BSF Jawan Viral VideoDainik Gomantak

BSF Jawan Viral Video

देशात तापमानाचा पार दिवसेंदिवस वाढतच जात आहे. वाढत्या तापमानामुळे लोक हैराण झाले आहेत. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर बाहेर जाणे टाळावे असा सल्ला दिला जात असला तरी सीमेवरील जवानाने देशाचे रक्षण करण्यासाठी तैनात राहावे लागते.

राजस्थानमधील बिकानेर सीमेवर किती गर्मी आहे याचा एक व्हिडिओ सध्या एका बीएसएफ जमावाने शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्य तर वाटेलच पण एवढ्या तापमानात सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांचा देखील अभिमान वाटेल.

मुळात वाळवंटी प्रदेश म्हणून ओळख असलेल्या या सीमाप्रेदशात एक बीएसएफ जवान हातात कच्चा पापड घेऊन तो तापलेल्या वाळूत ठेवतो. त्या पापडावर थोडी वाळू पसरून काही काळ प्रतिक्षा केल्यानंतर हा पापड चक्क भाजून कडकडीत होतो.

जवानाने भाजलेला पापड नंतर सहज तोडून देखील दाखवला आहे. मेगा अपडेटच्या वतीने शेअर केलेल्या या व्हिडिओत बिकानेरमध्ये 47 अंश सेल्सियस तापमान असल्याचा दावा केला आहे.

BSF Jawan Viral Video
Goa Today's Live News: आम आदमी दिल्ली आणि महिला विरोधी पक्ष - मुख्यमंत्री डॉ. सावंत

सीमारक्षण करणाऱ्या जवानांचे कौतुक

या व्हिडिओला बातमी करतेवेळी दोन लाखांपेक्षा अधिक व्हिव्ज मिळाल्या होत्या तर जवळपास नऊ हजार जणांनी याला लाईक केले होते. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या असून, जवानांचे कौतुक केले आहे.

एवढ्या प्रचंड तापमानात भारतीय सीमेचे रक्षण करणाऱ्या भारतीय शूर जवानांना सलाम, अशा कमेंट अनेकांनी केल्या आहेत.

काहींनी एवढ्या गर्मीत पापडच काय दुश्मन देखील जळून खाक होईल, अशा आशयाच्या कमेंट केल्या आहेत. दरम्यान, सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com