उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी ब्रिक्स प्रभावी मंच: पंतप्रधान मोदी

'ब्रिक्सच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त या शिखर परिषदेचे अध्यक्ष होणे, माझ्यासाठी (Prime Minister Modi) आणि भारतासाठी आनंदाची गोष्ट आहे.
Prime Minister Modi
Prime Minister ModiDainik Gomantak
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) यांनी गुरुवारी ब्रिक्स शिखर परिषदेच्या (BRICS summit) अध्यक्षस्थान भूषवले. दरम्यान आपल्या भाषणात पीएम मोदी म्हणाले, 'ब्रिक्सच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त या शिखर परिषदेचे अध्यक्ष होणे, माझ्यासाठी आणि भारतासाठी आनंदाची गोष्ट आहे. आमच्याकडे आजच्या बैठकीचा सविस्तर अजेंडा आहे. ब्रिक्सने गेल्या दीड दशकांत उत्तम कामगिरी केली आहे. आज आपण जगातील उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी एक प्रभावी आवाज आहोत. विकसनशील देशांच्या (Developing Countries) प्राधान्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ब्रिक्सचा मंच उपयुक्त ठरला आहे.

दरम्यान, पुढील 15 वर्षांत ब्रिक्स अधिक प्रभावी आणि फलदायी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मोदी पुढे म्हणाले, भारताने आपल्या अध्यक्षपदासाठी निवडलेली थीम ही प्राधान्य प्रतिबिंबित करते - “BRICS at 15: Intra-BRICS Cooperation for Continuity, Consolidation and Consensus.”

Prime Minister Modi
BRICS Summit: मोदींच्या अध्यक्षतेखाली पाच देशांची बैठक, अफगाणिस्तानवर होणार चर्चा

शिवाय, पंतप्रधान म्हणाले, 'नुकतीच पहिली "ब्रिक्स डिजिटल आरोग्य परिषद" आयोजित करण्यात आली होती. तंत्रज्ञानाच्या मदतीने health access वाढवण्यासाठी हे एक अभिनव पाऊल आहे. नोव्हेंबरमध्ये आमचे जल संसाधन मंत्री ब्रिक्स फॉर्मेटमध्ये पहिल्यांदा सहभागी होतील. ब्रिक्सने "बहुपक्षीय प्रणालींना बळकट करणे आणि सुधारणे" या विषयावर समान भूमिका घेतल्याचे प्रथमच घडले. आम्ही ब्रिक्स "काउंटर टेररिझम अॅक्शन प्लॅन" देखील स्वीकारला आहे.

पंतप्रधान म्हणाले की, जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही ब्रिक्सच्या 150 हून अधिक बैठका आणि कार्यक्रमांचे आयोजन केले होते, त्यापैकी 20 हून अधिक मंत्री स्तरावरील होत्या.

Prime Minister Modi
BRICS Meeting: एनएसए अजित डोवाल यांनी बैठकीत अफगाण संकटाचा मुद्दा केला उपस्थित

तसेच, भारत 2021 मध्ये ब्रिक्सचे अध्यक्ष आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin), चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा हेही या बैठकीला उपस्थित होते. पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा ब्रिक्स परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवले. यापूर्वी 2016 मध्ये त्यांनी गोवा शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते. ब्रिक्सचे 15 वे स्थापना वर्ष साजरे होत असताना या वर्षी भारत ब्रिक्सचे अध्यक्षता करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com