Justice Dipankar Dutta: मुंबई HC चे मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता यांनी घेतली SC चे न्यायाधीश म्हणून शपथ

Justice Dipankar Dutta: भारताचे सरन्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड यांनी सोमवारी (12 डिसेंबर) दीपांकर दत्ता यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ दिली.
Justice Dipankar Dutta
Justice Dipankar DuttaDainik Gomantak
Published on
Updated on

Justice Dipankar Dutta: भारताचे सरन्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड यांनी सोमवारी (12 डिसेंबर) मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदाची शपथ दिली. कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश दिवंगत सलील कुमार दत्ता यांचे पुत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अमिताव रॉय यांचे नातेवाईक न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी सकाळी 10.36 वाजता शपथ घेतली.

दरम्यान, न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या शपथविधीमुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या 28 झाली आहे. सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) न्यायाधीशांची एकूण मंजूर संख्या 34 आहे.

Justice Dipankar Dutta
Supreme Court: काही वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यामुळे नोकरी नाकारता येणार नाही; सर्वोच्च न्यायालय

न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांचा कार्यकाळ 8 फेब्रुवारी 2030 पर्यंत असेल

केंद्रीय कायदा मंत्रालयाच्या न्याय विभागाने रविवारी (11 डिसेंबर) एक अधिसूचना जारी करुन त्यांची नियुक्ती जाहीर केली होती. न्यायमूर्ती दत्ता यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1965 रोजी झाला. या वर्षी ते 57 वर्षांचे झाले असून सर्वोच्च न्यायालयात त्यांचा कार्यकाळ 8 फेब्रुवारी 2030 पर्यंत राहील. सर्वोच्च न्यायालयात निवृत्तीचे वय 65 वर्षे आहे.

राष्ट्रपतींनी नियुक्तीपत्र जारी केले

26 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती यूयू लळित (आता निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने दत्ता यांच्या नावाची शिफारस केली होती. सुमारे अडीच महिन्यांनंतर सरकारने या शिफारसीवर शिक्कामोर्तब करुन अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले. त्यास मंजूरी देताना राष्ट्रपतींनी नियुक्तीचे पत्र जारी केले. सध्या, सर्वोच्च न्यायालयात एकूण 34 न्यायाधीशांच्या निश्चित संख्याबळाच्या तुलनेत केवळ 27 न्यायाधीश कार्यरत आहेत.

Justice Dipankar Dutta
Supreme Court: 'लोकांना श्वास घेऊ द्या', फटाक्यांच्या बंदीवर सर्वोच्च न्यायालय म्हणाले

न्यायमूर्ती दत्ता यांची 22 जून 2006 रोजी पदोन्नती झाली.

न्यायमूर्ती दत्ता यांची 22 जून 2006 रोजी कोलकता (Kolkata) उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली. यानंतर, 28 एप्रिल 2020 रोजी त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनवण्यात आले. कोलकाता उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, त्यांनी 1989 मध्ये कोलकाता विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. यानंतर 16 नोव्हेंबर 1989 रोजी त्यांची वकील म्हणून नोंदणी झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com