
Viral Wedding Video 2025: जिथे जिथे लोकांना काही विचित्र किंवा अनोखे दिसते तिथे ते लगेचच त्यांच्या फोनमध्ये रेकॉर्ड करतात. यानंतर, ते जास्त काही न करता तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतात. यानंतर सर्व काम सोशल मीडिया यूजर्स बरोबर करतात. जर तो व्हिडिओ इतर लोकांनाही विचित्र किंवा अनोखा वाटला तर तो व्हिडिओ व्हायरल होतो. जर तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल तर तुम्ही असे बरेच व्हायरल व्हिडिओ पाहिले असतील. आताही एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
तुम्ही आतापर्यंत अनेक लग्नांना उपस्थित राहिला असाल. तिथल्या सजावटी आणि इतर गोष्टींनी तुमचे लक्षही वेधून घेतले असेल, पण तुम्ही कधी लग्नात (Marriage) वरमाला समारंभानंतर लोकांना त्यांची बॉडी दाखवताना पाहिले आहे का? होय, असे विचारल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटले ना... पण व्हायरल व्हिडिओमध्ये असेच काहीसे दिसत येत आहे. व्हिडिओमध्ये असे दिसते की, वधू आणि वर त्यांच्या जागी बसले असून त्यांच्यासमोर तीन बॉडीबिल्डर मुले त्यांची बॉडी दाखवत आहेत. तर स्टेजखाली उभे असलेले लोक त्यांचा व्हिडिओ बनवत आहेत. त्यापैकीच एकाने हा व्हिडिओ व्हायरल केला.
तुम्ही आत्ताच पाहिलेला व्हिडिओ @ChapraZila नावाच्या अकाउंटवरुन X प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'बिहारच्या लग्नांमध्ये आजकाल काय नवीन नाटक सुरु झाले आहे.' बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत, व्हिडिओ 10 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एकाने कमेंट करत लिहिले की, वधू-वरांना कोणी मारणार आहे का?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.