
नवी दिल्ली: प्रतिष्ठित ‘बोइंग’ कंपनीचे ‘ड्रीमलाइनर’ हे विमान ‘लंबी रेस का घोडा’ म्हणून ओळखले जाते. मागील चौदा वर्षांपासून ते विविध देशांच्या आकाशावर अधिराज्य गाजवत असून गुजरातमधील अपघातानंतर संबंधित विमान आणि त्याच्या तंत्रज्ञानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हा अपघात बोइंगच्या प्रतिष्ठेलाच मोठा धक्का असल्याचे हवाई वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ‘बी-७८७’ हे जगभरात सर्वाधिक विकले जाणारे विमान म्हणून ओळखले जाते.
‘ड्रीमलाइनर’साठी उच्च सुरक्षा मानकांचा वापर करण्यात आला असून इतर विमानांच्या तुलनेत त्याला कमीच इंधन लागते. आतापर्यंत या विमानाला अशा पद्धतीने कधीच अपघात झाला नव्हता.
गुजरातमधील विमान अपघाताच्या निमित्ताने जॉन बार्नेट हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कधीकाळी बोइंग कंपनीमध्ये माजी गुणवत्ता व्यवस्थापक असलेल्या या कर्मचाऱ्याने ‘ड्रीमलाइनर’च्या एकूण निर्मिती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. कंपनीने अनेक तांत्रिक बाबींमध्ये तडजोड केले असल्याचा आरोप त्यांनी केल्यानंतर जगभर खळबळ निर्माण झाली होती. मागील वर्षी त्यांचा गूढ मृत्यू झाला होता.
बार्नेट यांनी कंपनीच्यविरोधात २०१७ मध्ये ‘फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन’ (एफएए) आणि ‘ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन’कडे (ओएसएचए)अधिकृत तक्रार नोंदविली होती. ‘एफएए’ ने देखील त्यांच्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन कंपनीला तातडीने उपाययोजना आखण्याचे निर्देश दिले होते. ‘ओएसएचए’ ने मात्र बार्नेट यांचे आरोप फेटाळून लावताना २०२१ मध्ये कंपनीच्या बाजूने निकाल दिला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.