Chhattisgarh Accident: मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये भीषण अपघात, पिकअपखाली चिरडून 18 मजुरांचा मृत्यू; 20 हून अधिक जखमी

Chhattisgarh Accident: छत्तीसगडमधील कावर्धा येथे भीषण अपघात झाला आहे. तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या मजुरांची पिकअप नियंत्रणाबाहेर गेली आणि 20 फूट खोल अशा खड्ड्यात पडली.
Accident
AccidentDainik Gomantak

Chhattisgarh Accident: छत्तीसगडमधील कावर्धा येथे भीषण अपघात झाला आहे. तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या मजुरांची पिकअप नियंत्रणाबाहेर गेली आणि 20 फूट खोल अशा खड्ड्यात पडली. या अपघातात पिकअपखाली चिरडून 18 मजुरांचा मृत्यू झाला, तर 20 हून अधिक जण गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस-प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी बचावकार्य सुरु केले आणि पिकअपखाली दबलेल्या मजुरांना कसेतरी बाहेर काढले. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघाताचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये मजूर पिकअपजवळ पडलेले दिसत आहेत.

दरम्यान, कबीरधाम जिल्ह्यातील कुकडूर पोलीस स्टेशन हद्दीतील बहापनी गावात हा अपघात झाला. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास हे मजूर जंगलातून तेंदूपत्ता तोडून पिकअपमधून परतत होते. पिकअपमध्ये सुमारे 40 मजूर होते. दरम्यान, वाटेत पिकअप ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि पिकअप 20 फूट खोल खड्ड्यात पडली. या अपघातात 18 मजुरांचा चिरडून मृत्यू झाला. तर 20 हून अधिक मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

Accident
Chhattisgarh: छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई; 12 नक्षलवादी ठार!

अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या गावातील लोक घटनास्थळी पोहोचले. लोकांनी याची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पोलीस ठाणे गाठून वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली आणि स्थानिक लोकांच्या मदतीने पिकअपखालून मजूरांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.

काही वेळाने इतर पोलीस ठाण्यांतील पोलीस (Police) दलासह वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सर्व जखमी मजुरांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या अपघातात आतापर्यंत 18 मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. 20 हून अधिक मजूर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Accident
Chhattisgarh Crime: सहा महिन्यांत 173 अटक, 194 सरेंडर अन् 33 ठार; छत्तीसगडमध्ये माओवाद्यांविरोधीतील कारवाई तीव्र

दुसरीकडे, पिकअपमधून प्रवास करणारे सर्व मजूर सेमहरा गावचे रहिवासी आहेत. या हंगामात तेंदूपत्ता गोळा करण्याचे काम गावकरी करतात. सोमवारी सकाळी सुमारे 40 बैगा आदिवासी स्त्री-पुरुष पिकअपमधून तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेले होते. दुपारी अडीचच्या सुमारास परतत होते. दरम्यान, बहापाणी गावाजवळ वाहनावरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या 20 फूट खोल खड्ड्यात पडल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात (Accident) 18 स्त्री-पुरुष मजुरांचा मृत्यू झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com