निवडणूक निकालानंतर 5 पैकी 4 राज्यांमध्ये 'भाजप'चाच भगवा फडकणार: अमित शहा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा भाजपला होईल: अमित शहा
 J P Nadda and Amit Shah
J P Nadda and Amit Shah Dainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: गोवा, उत्तराखंड, मणिपूर, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष 10 मार्चच्या निकालानंतर सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा करत आहेत. यातच आता केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी देखील 5 पैकी 4 राज्यांमध्ये भाजपचा भगवा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास दर्शवला आहे. पाचही राज्यांमधील मतदान प्रक्रिया संपल्यावर शनिवारी भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J.P.Nadda) बोलत होते. (Amit Shah News)

 J P Nadda and Amit Shah
कानपूर विमानतळावर लॅंडींगदरम्यान विमानाचे इंजिन निकामी; जीवितहानी नाही

"गोव्यासह उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर या चारही राज्यांमध्ये पुन्हा भाजप सत्ता स्थापन करेल तर पंजाबमध्ये पक्ष मजबूत होईल. भाजपने केलेल्या कामांवर जनता समाधानी आहे. जनता आम्हालाच पसंती देईल," असा ठाम विश्वास भाजप नेते अमित शहा यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला.

"पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा भाजपला होईल. उत्तर प्रदेशात कोणत्याही अन्य पक्षाच्या मदतीशिवाय पूर्ण बहुमताने भाजपचे सरकार स्थापन होईल", असा दावा अमित शहा (Amit Shah) यांनी केला.

 J P Nadda and Amit Shah
ताबडतोब टाकी भरुन घ्या, 'इलेक्शन ऑफर' संपत चाललीयं

"ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याचे काम सुरू आहे. याचा सकारात्मक परिणाम पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत दिसेल," असेही शहा यावेळी म्हणाले.

गोव्यासह उर्वरीत राज्यांमध्ये भाजपचे पूर्ण बहुमताने सरकार स्थापन होईल. या निवडणुकीत देशाचे सशक्तीकरण, हा मुद्दा प्रमुख राहिला आहे. समाजाच्या प्रत्येक वर्गाची प्रगती होते, तेव्हाच देशाचे सशक्तीकरण होते. याचसाठी केंद्र आणि राज्यातील भाजपची सरकारने शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत.

- जे. पी. नड्डा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com