Manipur Assembly Election Result : मणिपूरमध्ये भाजप पुन्हा सत्तेच्या वाटेवर

Manipur Election Result 2022: पुन्हा एकदा भाजप सत्तेच्या जवळ
Goa BJP
Goa BJPDainik Gomantak
Published on
Updated on

Manipur Assembly Election Result : देशातील पाच राज्यांचे निकाल हाती येत असून एक्झिट पोलनुसार भाजपला जनादेश मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. त्याप्रमाणे फक्त पंजाब सोडता इतर चार राज्यात भाजप वरचढ असल्याचे दिसत आहे. तर भाजपचे उमेदवार विजयाच्या वाटेवर आहेत. गोव्या प्रमाणेच लहान असणाऱ्या मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election) निकाल हाती येत असून 60 जागांपैकी भाजप 26 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस (Congress) 11, एनपीएफ 5, एनपीपी 10 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजप (BJP) सत्ता स्थापन करण्याच्या वाटेवर असल्याचेच चित्र समोर येत आहे. (BJP on the way to regain power in Manipur)

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेंदर सिंग आघाडीवर

मुख्यमंत्री (Chief Minister) एन बिरेन सिंग हेंगांगमधील काँग्रेस उमेदवारापेक्षा 8,574 मतांनी आघाडीवर आहेत. तर मणिपूर (Manipur) काँग्रेसचे अध्यक्ष एन लोकेन सिंग हे भाजप उमेदवार थौनाओजम बसंता यांच्यापेक्षा नंबोलमध्ये 4,426 मतांनी पिछाडीवर आहेत. मात्र माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओ इबोबी सिंग थौबलमध्ये भाजपच्या एल बसंता यांच्यापेक्षा 472 मतांनी आघाडीवर असल्याचे कळत आहे.

सत्तेच आम्हीच असा भाजप- काँग्रेसने केला होता दावा

निवडणुकीपूर्वी तर मतमोजणी आधीही भाजपसह काँग्रेसने देखील आपण राज्यात सत्तेत येऊ असा दावा केला होता. तर मणिपूर भाजप अध्यक्ष ए शारदा देवी यांनी, 60 जागांपैकी भाजप (BJP) 40 पेक्षा जास्त जागा जिंकेल असे म्हटले होते. तर माजी मुख्यमंत्री (Former Chief Minister) आणि काँग्रेस नेते ओकराम इबोबी सिंग (Congress leader Okram Ibobi Singh) यांनी देखील, त्यांचा पक्ष राज्यात पुन्हा सत्तेवर येईल असे म्हटले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com