''पंडित नेहरु व्होट न मिळवता PM बनले होते''; खर्गे यांच्या वक्तव्यावर भाजप खासदाराचा पलटवार

BJP MP Sudhanshu Trivedi: आगामी लोकसभा निवडणूकीची तयारी सत्ताधारी भाजप आणि विरोधकांनी जोरात सुरु केली आहे.
BJP MP Sudhanshu Trivedi
BJP MP Sudhanshu TrivediDainik Gomantak

BJP MP Sudhanshu Trivedi: आगामी लोकसभा निवडणूकीची तयारी सत्ताधारी भाजप आणि विरोधकांनी जोरात सुरु केली आहे. यातच, राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपने पलटवार केला आहे. खरे तर, मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले होते की, 'जर पंतप्रधान मोदी 2024 मध्येही सत्तेत राहिले तर भारतात कधीही निवडणुका होणार नाहीत.' त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप खासदार डॉ.सुधांशू त्रिवेदी यांनी पलटवार केला आहे.

खर्गे यांच्या वक्तव्यावर भाजप खासदाराने पलटवार केला

खासदार सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, मल्लिकार्जुन खर्गे काहीही म्हणाले तरी 'त्याचा खरा अर्थ असा आहे की, ज्यांना लोकशाहीच्या नावाखाली मतदारांनी गेल्या निवडणुकीत पूर्णपणे नाकारले होते, त्यांना आता ग्रहण लागले आहे. आता खरी लोकशाही उदयास येणार आहे. पंडित नेहरु झिरो व्होट मिळवून पंतप्रधान झाले होते, श्रीमती इंदिरा गांधी आणि राजीव गांधी पंतप्रधान कसे झाले हे सर्वांना माहीत आहे.''

BJP MP Sudhanshu Trivedi
Amit Shah: केंद्र सरकारची मोठी घोषणा! अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मॉब लिंचिंगसाठी आता फाशीची शिक्षा

ते पुढे म्हणाले की, ''2019 च्या लोकसभा निवडणुकीत लोकशाहीच्या नावाखाली राजेशाही चालवणाऱ्यांना उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या प्रबुद्ध जनतेने धडा शिकवला. काश्मीरमध्ये अब्दुल्ला किंवा मुफ्ती घराणे निवडणूक हरले. बादल कुटुंब पंजाबमध्ये निवडणूक हरले, हुड्डा कुटुंब हरियाणात निवडणूक हरले, अशोक गेहलोत जी यांचा मुलगा निवडणूक हरला, अखिलेश यादव यांची पत्नी उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक हरली, चौधरी अजित सिंह आणि त्यांचे पुत्र निवडणूक हरले, लालू प्रसाद यादव यांची मुलगी बिहारमध्ये निवडणूक हरली. केसीआर जी यांची मुलगी तेलंगणात निवडणूक हरली.''

BJP MP Sudhanshu Trivedi
Amit Shah On Article 370 : "राहुल बाबा, काश्मीरमधून कलम 370 तर हटवलेच, पण कोणी..." अमित शाह यांचा राहुल गांधींना टोला

त्रिवेदी पुढे असेही म्हणाले की, ''नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत संपूर्णपणे कोलमडल्यानंतर आता या तथाकथित इंडिया विरोधी आघाडीच्या मैत्रीला तडा गेला आहे. या घबराटीत काँग्रेस पक्षाने आता आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी निराधार आणि बेताल वक्तव्य केले.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com