Uttarakhand Assembly Election 2022 : भाजपची 47 जागांवर आघाडी

Uttarakhand Assembly Election 2022 : भाजपचा विजय जवळपास निश्चित
Congress leader Harish Rawat
Congress leader Harish Rawatdainik gomantak
Published on
Updated on

Uttarakhand Assembly Election 2022 : उत्तराखंडमधील सर्व 70 जागांचे निकाल हळूहळू येऊ लागले आहेत. येथे भाजपने सर्व पक्षांना मागे सोडत 41 जागांवर सर्वात मोठी आघाडी घेतली होती. तर काँग्रेस 25 जागांवर आघाडीवर होते. मात्र आम आदमी पक्षाला खातेही उघडता आले नसून इतर पक्ष 4 जागांवर आघाडीवर आहेत. दरम्यान भाजपने 47 जागांवर आघाडी कायम ठेवली ठेवल्याने उघड झाले असून काँग्रेस केवळ 19 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपने 47 जागांवर आघाडी घेतल्याने भाजपचा विजय निश्चित मानला जात असून पुन्हा भाजपचे सरकार (BJP government) स्थापन होत आहे. (BJP leads by 47 seats in Uttarakhand Assembly elections)

मात्र उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या निवडणुकीच्या निकालात चढ-उतार पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे खतिमा मतदारसंघातून एक हजार मतांनी आघाडीवर असून धामी यांना त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून कडवी स्पर्धा मिळत आहे. मात्र, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री (CM) हरीश रावत यांच्या पराभवामुळे शांतता पसरली आहे.

Congress leader Harish Rawat
Punjab Assembly Election Result 2022 : दिल्लीनंतर आता पंजाब, संपूर्ण देशात इन्कलाब होणार

बहुमतासाठी 36 जागा आवश्यक

उत्तराखंड (Uttarakhand) विधानसभेच्या एकूण 70 जागा असून सरकार स्थापनेसाठी 36 जागांची आवश्यकता असते. सध्या भाजपने 47 जागांवर आघाडी घेतल्याने तो मोठा पक्ष ठरला आहे.

भाजपने दहापैकी नऊ जागा जिंकल्या

डेहराडूनमध्ये भाजपने (BJP) दहापैकी नऊ जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केलं आहे. मात्र चक्रता मतदारसंघातून काँग्रेसचे (Congress) प्रीतम सिंह विजयी झाले आहेत. त्याचबरोबर हरक सिंग रावत यांची सून अनुकृति गुसांई या जवळपास विजयी झाल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com