उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह (Kalyan Singh) यांचे दीर्घ आजाराने शनिवारी वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. रविवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) कल्याण सिंह यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लखनौला आले होते. पंतप्रधान म्हणाले की, कल्याण सिंह हे एक मौल्यवान व्यक्तिमत्व आणि एक सक्षम नेते होते जे सामान्य लोकांसाठी "विश्वासाचे प्रतीक" बनले. कल्याण सिंह यांचे पार्थिव दर्शानासाठी ठेवले असतानाचा एक फोटो सध्या सध्या व्हायरल होतो आहे, हा फोटो व्हायरल होण्याचे कारण म्हणजे त्यांच्या पार्थिवावर तिरंगा आणि त्यावर भारतीय जनता पक्षाचा ध्वज दिसून आला आहे.
सोशल मीडियावर या फोटोवर विविध प्रतिक्रिया उमटल्याचे दिसुन येत आहेत. युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांनी विचारले की, "नवीन भारतामध्ये भारतीय ध्वजावर पक्षाचा झेंडा लावणे ठीक आहे का?" युवक काँग्रेसने आपल्या अधिकृत हँडलवरून हिंदीत ट्विट केले की, "भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान सहन करणार नाही."
समाजवादी पक्षाचे प्रवक्ते घनश्याम तिवारी यांनी ट्विट केले की, "देशापेक्षा मोठा पक्ष, तिरंग्यापेक्षा मोठा पक्षाचा झेंडा, भाजपला नेहमीप्रमाणे ना खेद, ना पश्चाताप, ना दु: ख."
दरम्यान, अनेकांनी यावेळी केंद्र सरकाने शेतकरी आंदोलनातील त्या भुमिकेवरही प्रश्न उपस्थित केला, जेव्हा लाल किल्ल्यावर ध्वजाचा अनादर दिसून झाल्याचे दिसुन आले होते. यावेळी केंद्र सरकाने म्हटले होते की "ध्वजाचा अनादर सहन करणार नाही".
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.