BJP Leader Murder: आधी टिपर ट्रकने धडक दिली, मग पेट्रोल टाकून पेटवलं; भाजप नेत्याला कारमध्ये जिवंत जाळलं

bjp leader burned alive: छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.
BJP Leader Murder
BJP Leader MurderDainik Gomantak
Published on
Updated on

छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील सोनहत तहसील अंतर्गत येणाऱ्या कटगोडी गावात वाळू उत्खननाच्या जुन्या वादातून भाजपच्या स्थानिक नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. भरत सिंह गहरवार उर्फ लल्ला सिंह असे या मृत भाजप नेत्याचे नाव आहे. हल्लेखोरांनी त्यांना त्यांच्याच फॉर्च्युनर गाडीत कोंडून जिवंत जाळल्याचा गंभीर आरोप होत आहे. या भीषण घटनेत अन्य तीन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

काय आहे संपूर्ण घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास भरत सिंह आपल्या सहकाऱ्यांसोबत फॉर्च्युनर गाडीतून नवगाई गावाकडे जात होते. त्यावेळी काही हल्लेखोरांनी एका टिपरच्या साहाय्याने भरत सिंह यांच्या गाडीला वारंवार जोराची धडक दिली.

धडकेमुळे गाडीचे दरवाजे लॉक झाले आणि ती पूर्णपणे निकामी झाली. त्यानंतर हल्लेखोरांनी गाडीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरही हल्ला करण्यात आल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. या आगीत भरत सिंह होरपळून जागीच ठार झाले, तर त्यांच्यासोबत असलेले तिघे गंभीर भाजले असून त्यांच्यावर अंबिकापूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.

BJP Leader Murder
Goa Agriculture: पाऊस काय पडेना! राज्‍यातील शेतकरी गलितगात्र! तरवा सुकला, खते मातीमोल; सर्वच पिकांना धोका

राजकीय वर्चस्व आणि वादाची पार्श्वभूमी

तपासातून असे समोर आले आहे की, भरत सिंह आणि आरोपी मनोज त्रिपाठी यांच्यात वाळू आणि दगड उत्खननाच्या व्यवसायावरून दीर्घकाळापासून संघर्ष सुरू होता. धक्कादायक बाब म्हणजे, या वादाचे रूपांतर हिंसक वळणात होण्याची चिन्हे मंगळवारी दुपारच्या वेळीच दिसली होती.

दोन्ही गटांत दुपारी बाचाबाची झाली होती, ज्याची माहिती पोलिसांनाही देण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी याकडे वेळीच गांभीर्याने न पाहिल्याने रात्री ही मोठी दुर्घटना घडली. संशयास्पद म्हणजे, आरोपी आणि मृत भाजप नेता दोघेही एकाच पक्षाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे, ज्यामुळे स्थानिक पातळीवर मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

BJP Leader Murder
Goa Health Services: राज्यात 'आयसीयू' सेवांना बळ, 'आयुर्वेद आरोग्य व्यवस्थापन'ला मंत्रिमंडळाची मंजुरी

पोलीस कारवाई आणि फॉरेंसिक तपास

घटनेची माहिती मिळताच सरगुजा रेंजचे पोलीस महानिरीक्षक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मनोज त्रिपाठी आणि निशांत त्रिपाठीसह चार जणांना आतापर्यंत अटक केली आहे. इतर संशयितांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, पोलीस आता या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. गाडीला आग नेमकी कशामुळे लागली पेट्रोल टाकल्यामुळे की बिजलीच्या खांबाला धडकल्यामुळे याचा उलगडा करण्यासाठी फॉरेंसिक तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. संपूर्ण परिसरात सध्या तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com