आंध्र प्रदेशातील 'जिना टॉवर'चे नाव बदलण्यासाठी भाजप आक्रमक!

महात्मा गांधी रोडवरील गुंटूरच्या मध्यभागी असलेले जिना टॉवर (Jinnah Tower) हे 1945 च्या सुमारास बांधण्यात आलेले स्मारक आहे.
Jinnah Tower

Jinnah Tower

Dainik Gomantak 

Published on
Updated on

भारतीय जनता पक्षाने (BJP) आंध्र प्रदेश सरकारला (Andhra Pradesh Government) गुंटूरमधील 'जिना टॉवर' चे नाव बदलण्याची मागणी केली आहे. महात्मा गांधी रोडवरील गुंटूरच्या मध्यभागी असलेले जिना टॉवर (Jinnah Tower) हे 1945 च्या सुमारास बांधण्यात आलेले स्मारक आहे. या टॉवरला घुमटाच्या आकाराची रचना असलेले सहा खांब असून स्थानिक लोक ते सौहार्द आणि शांततेचे प्रतीक मानतात. एवढेच नाही तर या जागेला जिना सेंटर म्हणूनही ओळखले जाते.

दरम्यान, भारताच्या फाळणीला जबाबदार असलेल्या व्यक्तीच्या नावाचे प्रतीक असल्याने राज्य सरकारने स्मारक आणि जागेवरुन ‘जिना’ हे नाव काढून टाकावे, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव वाय सत्य कुमार (Y Satya Kumar) यांनी गुरुवारी सकाळी ट्विट करुन जिना टॉवरचे नाव बदलण्याची मागणी केली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, 'या टॉवरचे नाव जिना ठेवण्यात आले असून परिसराचे नावही जिना सेंटर ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे ते पाकिस्तानात (Pakistan) नसून आंध्र प्रदेशातील गुंटूर शहरात आहे.

<div class="paragraphs"><p>Jinnah Tower</p></div>
40 कोटींच्या संपत्तीसाठी महिलेची हत्या, पतीसह मुलीला अटक

टॉवरला डॉ. कलाम यांचे नाव देण्याची मागणी

ते पुढे म्हणाले, 'हे असे केंद्र आहे की आजही भारताच्या गद्दाराची आठवण करुन देते. या टॉवरला जीनांच्या ऐवजी डॉ. एपीजे अब्दुल कलाम (Dr. APJ Abdul Kalam) किंवा महान दलित कवी गुर्राम जोशुआ यांचे नाव का दिले जाऊ नये? याआधी भाजपच्या आंध्र प्रदेश युनिटचे अध्यक्ष सोमू वीरराजू यांनीही 'गुंटूरमधील स्मारकासाठी जिना यांचे नाव देण्यास भाजपचा तीव्र विरोध आहे' असे वक्तव्य केले होते.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी कठोर संघर्ष करणाऱ्या दुसऱ्या देशभक्ताचे नाव राज्य सरकारने या टॉवरला द्यावे, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली. वीरराजू म्हणाले, 'भारताचे विभाजन करुन पाकिस्तानच्या निर्मितीला जिना जबाबदार होते. त्यांनी देशातील लोकांमध्ये शत्रुत्वाची बीजे पेरली होती.'

जिना टॉवर पाडण्याची धमकी

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष एस विष्णुवर्धन रेड्डी यांनीही अशीच मागणी केली आहे. तर तेलंगणाचे भाजप आमदार टी राजा सिंह (T Raja Singh) यांनी एक पाऊल पुढे टाकत जिना टॉवर पाडण्याची धमकी दिली. भाजप नेते जिना टॉवरला भारताच्या फाळणीचे प्रतीक म्हणत आहेत. या जागेला अब्दुल कलाम यांचे नाव द्यावे किंवा अन्य कुणा देशभक्ताचे नाव द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com