
Caribbean Premier League 2025: कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) 2025 च्या 17व्या सामन्यात एक अतिशय विचित्र घटना पाहायला मिळाली. या सामन्यात गुयाना ॲमेझॉन वॉरियर्स आणि ट्रिनबागो नाइट रायडर्स हे संघ आमने-सामने होते. या सामन्यादरम्यान, ट्रिनबागो संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज शे होप एका विचित्र पद्धतीने बाद झाला, ज्याचा व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. क्रिकेटच्या इतिहासात असे खूप कमी वेळा घडले आहे, जेव्हा एखादा फलंदाज अशाप्रकारे बाद होतो.
दरम्यान, ही घटना ट्रिनबागो नाइट रायडर्सच्या डावातील 14 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर घडली. त्यावेळी शे होप फलंदाजी करत होता. तो गोलंदाज टेरेंस हिंड्सच्या चेंडूवर ‘रिव्हर्स रॅम्प’ शॉट खेळण्याचा प्रयत्न करत होता. शॉट खेळण्याच्या नादात त्याने बॅटवरील नियंत्रण गमावले आणि त्याची बॅट थेट स्टंपला लागली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्या चेंडूवर ही घटना घडली तो चेंडू ‘वाईड’ होता, पण बॅट स्टंपला लागल्याने शे होपला बाद घोषित करण्यात आले. शे होप बाद झाल्याचे पाहताच विरोधी संघाच्या खेळाडूंनी आनंदाने जल्लोष सुरु केला.
हा सामना ट्रिनबागो नाइट रायडर्स संघाने 6 विकेट्सने जिंकला. 17.2 षटकांत त्यांनी 164 धावांचे लक्ष्य गाठले. संघासाठी एलेक्स हेल्सने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 43 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 74 धावांची शानदार खेळी खेळली. त्याचा स्ट्राइक रेट 172.09 होता. त्याच्याशिवाय, कॉलिन मुनरोनेही 30 चेंडूंमध्ये 52 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. या दोन्ही फलंदाजांच्या तुफानी खेळीमुळे ट्रिनबागो संघाने हा सामना सहज जिंकला.
याआधी, पहिल्यांदा फलंदाजी करताना गुयाना ॲमेझॉन वॉरियर्सने 20 षटकांमध्ये 9 विकेट्स गमावून 163 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून शे होपने सर्वाधिक 29 चेंडूंमध्ये 39 धावा केल्या होत्या. त्याच्याव्यतिरिक्त, ड्वेन प्रिटोरियसने 21 आणि क्विंटन सॅम्पसनने 25 धावांचे योगदान दिले. गोलंदाजीमध्ये, ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून अकील हुसेनने 3 विकेट्स घेत उत्कृष्ट कामगिरी केली. या शानदार कामगिरीमुळे त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ चा पुरस्कारही मिळाला. एकीकडे शे होपच्या विचित्र विकेटची चर्चा झाली, तर दुसरीकडे त्याच्याच टीमचा विजय हा चर्चेचा विषय ठरला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.