VIDEO: ''अवघ्या एका इंचावर होता मृत्यू''! दरीत कोसळता-कोसळता वाचला पठ्ठ्या; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

Biker Near Death Experience Video: सध्या असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून ज्यामध्ये एका बाईक रायडरचा निष्काळजीपणा थेट त्याच्या जीवावर बेतताना दिसत आहे.
Biker Near Death Experience Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Biker Near Death Experience Video: सोशल मीडियावर दररोज काही ना काही विचित्र आणि अतरंगी पाहायला मिळते. यातील काही व्हिडिओ तर इतके वेगाने व्हायरल होतात की, आपण जितक्या वेळा फीड स्क्रोल करतो, तितक्या वेळा तेच व्हिडिओ समोर येतात. सध्या असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून ज्यामध्ये एका बाईक रायडरचा निष्काळजीपणा थेट त्याच्या जीवावर बेतताना दिसत आहे. सुदैवाने, केवळ नशिबाची साथ आणि काही इंचांच्या अंतरामुळे या तरुणाचा जीव वाचला.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका डोंगराळ आणि निसर्गरम्य रस्त्यावरील आहे. सध्या पावसाळा सुरु असल्याने रस्ते पूर्णपणे ओले आणि निसरडे आहेत. एका बाईकस्वाराच्या हेल्मेट कॅमेऱ्यात ही संपूर्ण थरारक घटना कैद झाली. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, पुढे एक तरुण अत्यंत वेगाने बाईक चालवत आहे. मात्र, अचानक चालत्या बाईकवर तो मागच्या बाजूला वळून पाहू लागतो. बाईक चालवताना समोर लक्ष देण्याऐवजी मागे पाहण्याच्या या एका चुकीमुळे त्याचे बाईकवरील नियंत्रण सुटते. काही सेकंदांतच त्याची बाईक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या खोल दरीच्या अगदी टोकावर जाऊन पोहोचते.

Biker Near Death Experience Video
Social Media Viral: पत्र्याला लटकला, काठीवर तोल सावरला अन्..., अतरंगी व्लॉगरचा भन्नाट व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "भावा, तुझ्या स्टंटमध्ये दम आहे"

ज्या क्षणी बाईक रस्त्याच्या कठड्याजवळ पोहोचते, अगदी त्याच क्षणी त्या तरुणाचे लक्ष समोर जाते. तो अत्यंत घाईघाईने आणि शर्थीचे प्रयत्न करुन बाईकवर ताबा मिळवतो आणि खाली दरीत कोसळण्यापासून स्वतःला वाचवतो. जर त्याला समोर पाहण्यास एक सेकंदाचाही उशीर झाला असता, तर तो थेट शेकडो फूट खोल दरीत कोसळला असता आणि त्याचा जागीच मृत्यू झाला असता. त्याच्या या अत्यंत बेजबाबदार आणि मूर्खपणाच्या कृत्यामुळे हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर (Internet) चर्चेचा विषय ठरला.

Biker Near Death Experience Video
Viral Video: 'मृत्यूला चकवा' देणारा थरार! पठ्ठ्यानं भरधाव रस्ता गाडी न पाहता केला क्रॉस; नेटकरी म्हणाले, ''हा लवकरच यमलोकात जाणार''

हा थरारक व्हिडिओ 'एक्स'वर '@yajnshri' नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये "या मूर्ख रायडरचा जीव जाता जाता वाचला" असे लिहिले. हा व्हिडिओ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून, त्यावर नेटकऱ्यांनी तीव्र संताप आणि आश्चर्य व्यक्त केले. एका युजरने लिहिले की, "हा तरुण अवघ्या एका इंचाने वाचला, नाहीतर थेट स्वर्गाचा रस्ता धरला असता." तर दुसऱ्या युजरने "हा गाडी चालवताना झोपला होता का?" असा प्रश्न विचारला. बाईक चालवताना थोडीशी निष्काळजीपणासुद्धा किती प्राणघातक ठरु शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com