

Viral Village Vlogger Stick Dance Video: सोशल मीडियावर दररोज काही ना काही विचित्र आणि अतरंगी पाहायला मिळते. आजकाल डिजिटल जगात प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तरुण पिढी कोणत्याही थराला जाण्यास तयार असल्याचे दिसते. असाच एक भन्नाट आणि मजेशीर प्रकार सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरला. स्वतःला 'गावचा एकुलता एक व्लॉगर' म्हणवणाऱ्या एका तरुणाने व्ह्यूज आणि लाईक्स मिळवण्यासाठी असा काही कारनामा केला, जो पाहून नेटकऱ्यांना आपले हसू रोखणे कठीण झाले.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, मातीत एक मोठा लाकडी दांडा किंवा काठी रोवलेली आहे. जवळच असलेल्या पत्र्याच्या शेडच्या लाकडाला पकडून एक तरुण लटकताना दिसतो. तो अतिशय कौशल्याने झुलत त्या रोवलेल्या दांड्यावर पोहोचतो आणि त्यावर स्वतःचे संतुलन साधतो. या अतरंगी अवस्थेत उभा राहून तो मोठ्या अभिमानाने कॅमेऱ्यासमोर सांगतो, "मी माझ्या गावचा एकुलता एक व्लॉगर आहे आणि मी माझ्या गावाचे नाव उज्ज्वल करुनच राहीन." एवढे बोलूनच तो थांबत नाही, तर त्याच दांड्यावर पूर्ण तोल सांभाळत अतरंगी डान्स करायला सुरुवात करतो. त्याचा हा अनोखा अंदाज आणि व्हिडिओतील कंटेंट इतका विचित्र आहे की, पाहणारा प्रत्येक जण अवाक होत आहे.
हा मजेशीर व्हिडिओ 'X'वर '@Shefaliditya89' नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला असून, "असा व्लॉगर तुम्ही कधी पाहिला आहे का?" असे कॅप्शन याला देण्यात आले. व्हिडिओ अपलोड होताच सोशल मीडियावर (Social Media) वाऱ्याच्या वेगाने पसरला असून लाखो लोकांनी तो पाहिला.
या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून विविध आणि मजेशीर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. एका युझरने लिहिले की, "भावा, तुझ्या स्टंटमध्ये दम आहे", तर दुसऱ्याने कमेंट केली, "अद्भूत प्रदर्शन!". काही लोकांनी मात्र यावर नाराजी व्यक्त करत "आता हे अति होत आहे, बंद करा हे सर्व" असा सल्लाही दिला, तर एका युझरने उपरोधाने "यापेक्षा मूर्ख माणूस मी कधी पाहिला नाही" अशी प्रतिक्रिया दिली. एकूणच, या व्लॉगरचा हा अतरंगी अवतार सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत असून तो दीर्घकाळ लोकांच्या लक्षात राहील यात शंका नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.