रेल्वेची मोठी घोषणा! बिहारमध्ये पहाटे 4 ते रात्री 8 पर्यंत ट्रेन बंद

बिहारमध्ये रेल्वेने एक मोठी घोषणा केली आहे. पहाटे 4 ते रात्री 8 या वेळेत कोणतीही ट्रेन धावणार नसल्याचे रेल्वेने घोषित केले आहे.
Bihar
BiharDainik Gomantak
Published on
Updated on

Agnipath Scheme Protest: बिहारमध्ये रेल्वेने एक मोठी घोषणा केली आहे. पहाटे 4 ते रात्री 8 या वेळेत कोणतीही ट्रेन धावणार नसल्याचे रेल्वेने घोषित केले आहे. 'अग्निपथ' योजनेविरोधात बिहारमध्ये सर्वाधिक हिंसाचार झाला आहे. संतप्त जमावाने डझनभर गाड्या पेटवल्या असून अनेक शहरे आणि गावांमध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. रेल्वे अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, एकट्या बिहारमध्ये रेल्वेचे ₹200 कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. (bihar no train run after 4 am till 8 pm due to agnipath scheme protest indian railway announce)

दरम्यान, 'अग्निपथ' भरती योजनेच्या विरोधात पुकारण्यात आलेला बंद यशस्वी करण्याच्या प्रयत्नात, आज सकाळी आंदोलकांची पोलिसांशी झटापट झाली. बिहारमधील (Bihar) अनेक शहरांत वाहनांची जाळपोळही संतप्त जमावाने केली.

Bihar
Agnipath Scheme Protest: सिकंदराबादमध्ये 1 ठार, 15 हून अधिक जखमी

तसेच, हिंसक आंदोलनांमुळे पूर्व मध्य रेल्वेने गाड्यांच्या संचलनात तात्पुरते बदल केले आहेत. रेल्वेने सांगितले की, 'प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, पूर्व मध्य रेल्वेच्या (Railways) कार्यक्षेत्रातून इतर ठिकाणी जाणाऱ्या गाड्यांच्या संचालनात तात्पुरता बदल करण्यात आला आहे.'

Bihar
Agnipath Row: गृह मंत्रालयाची मोठी घोषणा, या नोकरीत मिळणार 10% आरक्षण

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेची सुरक्षितता लक्षात घेता, 18.06.2022 रोजी 20.00 तास ते 19.06.2022 रोजी 04.00 तास आणि पुन्हा 19.06.2022 रोजी 20.00 ते 20.20.20.2020 पर्यंत असा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्व मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रातून जाणाऱ्या / पोहोचणाऱ्या गाड्या या वेळेपर्यंतच चालवल्या जातील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com