Odisha Train Tragedy: ओडिशा ट्रेन दुर्घटनेप्रकरणी 7 रेल्वे कर्मचारी निलंबित, सदोष मनुष्यवधाचा आरोप

Odisha Train Accident: यामध्ये वरिष्ठ विभाग अभियंता अरुणकुमार मोहंता, विभाग अभियंता मोहम्मद अमीर खान आणि तंत्रज्ञ पप्पू कुमार यांचा समावेश आहे.
Odisha Train Accident
Odisha Train AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

7 Railway Employees Suspended in Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे दुर्घटनेप्रकरणी सात रेल्वे कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. दक्षिण-पूर्व रेल्वेचे जीएम अनिल कुमार मिश्रा यांनी ही माहिती दिली आहे. बालासोर तिहेरी रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयने यापूर्वी तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक केली होती.

यामध्ये वरिष्ठ विभाग अभियंता अरुणकुमार मोहंता, विभाग अभियंता मोहम्मद अमीर खान आणि तंत्रज्ञ पप्पू कुमार यांचा समावेश आहे.

कर्मचार्‍यांवर सदोष मनुष्यवध आणि पुरावे नष्ट करण्याचे आरोप आहेत. या अपघातात 293 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 1000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

दरम्यान, गेल्या 25 वर्षांतील देशातील सर्वात मोठ्या रेल्वे अपघातांपैकी एक, चेन्नई-जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस, हावडा-जाणारी SMVT सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि मालगाडीचा बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला. या भीषण अपघातात (Accident) 290 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता तर 1200 हून अधिक लोक जखमी झाले होते.

Odisha Train Accident
Odisha Railway Accident : कुठे विखुरलेली खेळणी, तर कुठे प्रेमाच्या कविता... अपघाताचे असे दृश्य तुम्ही कधीच पाहिले नसेल!

बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ भरधाव वेगात असलेली कोरोमंडल एक्सप्रेस मुख्य मार्गाऐवजी पासिंग लूपमध्ये घुसली आणि थांबलेल्या मालगाडीला धडकली. या धडकेनंतर अनेक डबे रुळावरुन घसरले. तर डाऊन मार्गावर येणाऱ्या एसएमव्हीटी सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या मागील भागावर काही डबे आदळले.

Odisha Train Accident
Odisha Train Accident: चार आठवडे उलटूनही, अनेकांना प्रियजनांच्या मृतदेहाची प्रतिक्षा

तर अपघात टळला असता...

बालासोर येथे 2 जून रोजी अपघात झाला त्याच्या दोन महिने आधी रेल्वे मंडळाने सहा जनरल मॅनेजरना पत्र पाठवून सूचना केल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

कोलकाता-चेन्नई (कोरोमंडल एक्स्प्रेस), बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि मालगाडीचा अपघात झाला. त्याचे दोन तपास सध्या सुरू आहेत.

एका प्रकरणी, रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) तपास करत आहेत आणि दुसरी सीबीआय चौकशी सुरू आहे. वारंवार सूचना देऊनही स्थितीत कोणताही बदल झालेला नाही, असे वारंवार घडून येत असल्याचेही बोर्डाने पत्रात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com