ओडिशाच्या (Odisha) नवीन पटनायक सरकारमधील सर्व 20 मंत्र्यांनी आणि सभापती सूर्य नारायण पात्रा (Surya Narayan Patra) यांच्या राजीनाम्यानंतर, नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा रविवारी पार पडणार आहे. दुपारी 12 वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे. नवीन पटनायक सरकारमध्ये सभापतींसह संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा देण्याची ही पहिलीच वेळ. (Big change Resignation of entire cabinet A new cabinet will be formed)
सत्ताधारी बिजू जनता दल (बीजेडी) ने 29 मे रोजी आपल्या कार्यकाळाची तीन वर्षे पूर्ण केली आहेत. तेव्हापासून मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरू झाली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल करायचा आहे आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
2024 च्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते,
पटनायक सरकारने 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्ष मजबूत करण्यासाठी असा निर्णय घेतल्या बद्दल मानले जात आहे. राज्यात 2024 मध्येच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे नवीन पटनायक नव्या रणनीतीनुसार तरुण आणि ज्येष्ठ लोकांना मंत्रिमंडळात स्थान देऊ इच्छित असल्याचे सांगितले जात आहे.
पटनायक यांनी राजकारणात 25 वर्षे पूर्ण केली, तसेच मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राजकारणामध्ये 25 वर्षे पूर्ण केली आहेत. ते 1997 मध्ये आस्का लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांचे वडील बिजू पटनायक हे ओडिशाचे गाजलेले नेते होते.
वडिलांच्या निधनानंतर त्यांनी बिजू जनता दलाची स्थापना केली आणि तेव्हापासून ते दीर्घकाळ राज्याचे मुख्यमंत्री राहिले होते. नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखाली बिजू जनता दलाने ओडिशामध्ये 2000, 2004, 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग 5 वेळा सरकारची स्थापना केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.