निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जींना मोठा झटका, टीएमसीचे कोट्यवधी रुपये ईडीकडून जप्त; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

लोकसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांच्या पक्ष टीएमसीला मोठा झटका बसला आहे.
Mamata Banerjee
Mamata BanerjeeDainik Gomantak
Published on
Updated on

Money Laundering: लोकसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांना मोठा झटका बसला आहे. माजी राज्यसभा सदस्य केडी सिंह यांच्या नेतृत्वाखालील अल्केमिस्ट समूहाविरुद्ध मनी लाँड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) टीएमसीचे 10.29 कोटी रुपये जप्त केले आहेत. ही जप्ती तपास यंत्रणेने डिमांड ड्राफ्टद्वारे केली आहे

ईडी गुंतवणूक कंपनीविरुद्ध मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी करत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अल्केमिस्ट एअरवेज प्रायव्हेट लिमिटेडने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मुकुल रॉय, मुनमुन सेन, नुसरत जहाँ यासारख्या स्टार प्रचारकांना हेलिकॉप्टर पुरवल्याचा आरोप एजन्सीने केला आहे. यासाठी पक्षाने कंपनीला 10.29 कोटी रुपये दिले होते.

Mamata Banerjee
Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारला अपघात; डोक्याला दुखापत

"ईडी, दिल्ली झोनल ऑफिसने अल्केमिस्ट ग्रुप आणि इतरांकडून मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याचा तपास करताना डिमांड ड्राफ्टच्या रुपात टीएमसीशी संबंधित 10.29 कोटी रुपयांची रक्कम तात्पुरती जप्त केली आहे," असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले. अल्केमिस्ट गटाचे नेतृत्व माजी राज्यसभा सदस्य केडी सिंह करत आहेत, असे ईडीने एका निवेदनात म्हटले आहे. सिंह यांना आर्थिक गुन्हे अन्वेषण संस्थेने जानेवारी 2021 मध्ये अटक केली होती.

Mamata Banerjee
Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवरील व्यंगचित्र फॉरवर्ड करणाऱ्या प्राध्यापकाची तब्बल 11 वर्षानंतर सुटका

यापूर्वी, 28 फेब्रुवारी रोजी ईडीने अल्केमिस्ट प्रकरणात पश्चिम बंगालचे मंत्री अरुप बिस्वास यांना समन्स बजावले होते. केंद्रीय तपास यंत्रणेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या प्रकरणात सुमारे 1900 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप होता. अरुप यांना तृणमूलचे कोषाध्यक्ष म्हणून बोलावण्यात आले आहे. तृणमूल खात्याच्या तपशीलांची पडताळणी करण्यासाठी त्यांना बोलावण्यात आले होते. 2014 च्या निवडणूक प्रचारादरम्यान अरुप यांना आर्थिक व्यवहारांबद्दल विचारले जाऊ शकते, असा दावा सूत्राने केला आहे. राज्यमंत्र्यांनी ईडीकडे हजर राहण्यासाठी वेळ मागितला आहे.

Mamata Banerjee
Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवरील व्यंगचित्र फॉरवर्ड करणाऱ्या प्राध्यापकाची तब्बल 11 वर्षानंतर सुटका

दरम्यान, त्यांच्या अर्जावर विचार करुन निर्णय घेतला जाईल, असा दावा ईडीच्या सूत्राने केला. याप्रकरणी तृणमूलने भाजपवर टीका केली. त्यावेळी, तृणमूलचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी त्या प्रकरणी भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांना अटक का करु नये, असा प्रश्न उपस्थित केला होता. तत्पूर्वी, पश्चिम बंगालच्या कृष्णनगर उत्तरचे आमदार मुकुल यांना ईडीने दिल्लीला बोलावले होते, परंतु शारीरिक कारणांमुळे ते दिल्लीला जाऊ शकले नाहीत. कुटुंबीयांच्या विनंतीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी कांचरापारा येथील मुकुल यांच्या घरी जाऊन चौकशी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com