पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, नवज्योत सिंग सिद्धूंचा राजीनामा

पंजाबमध्ये (Punjab) नवीन मंत्र्यांमध्ये विभागांची विभागणी झाली आहे, आणि काही तासांनंतरच सिद्धू यांनी सोनिया गांधींना (Sonia Gandhi) आपला राजीनामा पाठवला आहे.
पंजाबमध्ये (Punjab) काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, नवज्योत सिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांनी पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
पंजाबमध्ये (Punjab) काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, नवज्योत सिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांनी पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. Dainik Gomantak
Published on
Updated on

पंजाबमध्ये (Punjab) काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, नवज्योत सिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांनी पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. सिद्धू यांनी काँग्रेस (Congress) अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ते काँग्रेस पक्षाचे सदस्य राहतील. पंजाबमध्ये नवीन मंत्र्यांमध्ये विभागांची विभागणी झाली आहे, आणि काही तासांनंतरच सिद्धू यांनी सोनिया गांधींना (Sonia Gandhi) आपला राजीनामा पाठवला आहे.

पंजाबमध्ये (Punjab) काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, नवज्योत सिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांनी पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
पंजाब काँग्रेसमध्ये फूट, सोनीया गांधींनी मागितला मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

अलीकडच्या काही दिवसांत नवज्योतसिंग सिद्धू यांच्या मान्यतेने पंजाबात घडलेल्या घडामोडीनंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून काढून टाकण्यात आले, आणि दलित नेते चरणजीत सिंह चन्नी यांना पंजाबचे मुख्यमंत्रीपद सोपवण्यात आले.

नवज्योतसिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "माणसाचे चारित्र्य अधःपतन तडजोडीने सुरू होते. मी पंजाबच्या भविष्याशी आणि पंजाबच्या कल्याणाच्या अजेंड्याशी तडजोड करू शकत नाही ..., मी पंजाब काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे.... पण येथून पुढे मी काँग्रेसचीच सेवा करत राहतील ... असेही त्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Bihar Police AK47 Firing On Students Video
CJP Protest Violence Pakistan Social Media Connection
CJP Protest: "शांततापूर्ण आंदोलन हा घटनात्मक अधिकार!" विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज पोलिसांना नडला; दडपशाही रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा मास्टरप्लॅन
Kerala MLA MP Cabinet Berth Fraud Scam
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com