Bharat Taxi: रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि सुरक्षित प्रवास; केंद्र सरकार लाँच करणार 'भारत टॅक्सी' अ‍ॅप, ओला-उबरला टक्कर

Bharat Taxi App Launch: नवीन वर्षाची सुरुवात देशातील टॅक्सी प्रवाशांसाठी आणि चालकांसाठी अत्यंत आनंददायी ठरणार आहे.
Bharat Taxi
Bharat TaxiDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: नवीन वर्षाची सुरुवात देशातील टॅक्सी प्रवाशांसाठी आणि चालकांसाठी अत्यंत आनंददायी ठरणार आहे. १ जानेवारी २०२६ पासून केंद्र सरकारच्या पाठिंब्याने 'भारत टॅक्सी' (Bharat Taxi) हे नवीन अ‍ॅप अधिकृतपणे लाँच होत आहे. सध्या बाजारात मक्तेदारी गाजवणाऱ्या ओला आणि उबर सारख्या खाजगी कंपन्यांना हे अ‍ॅप जोरदार टक्कर देणार आहे. प्रवाशांची होणारी आर्थिक लूट थांबवणे आणि चालकांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

स्वस्त आणि पारदर्शक प्रवास

खाजगी टॅक्सी अ‍ॅप्समध्ये पाऊस, गर्दीची वेळ (Peak Hours) किंवा सणासुदीच्या काळात भाडे अचानक दोन ते तीन पटीने वाढवले जाते, ज्याला 'सर्ज प्राइसिंग' म्हटले जाते. मात्र, भारत टॅक्सी अ‍ॅपमध्ये अशा प्रकारची भाडेवाढ नसेल. सरकारी नियमांनुसार भाडे स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार असून, यामुळे सामान्य प्रवाशांना परवडणारी आणि विश्वासार्ह सेवा मिळेल. या अ‍ॅपमध्ये ऑटो-रिक्षा, कार आणि बाईक टॅक्सी असे तिन्ही पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Bharat Taxi
Goa Liberation Day: नेहरूंनी दिलेला 'तो' एक आदेश अन् गोवा झाला मुक्त; वाचा 36 तासांच्या धडाकेबाज मोहिमेचा थरार

कमाईत होणार मोठी वाढ

भारत टॅक्सीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे अ‍ॅप 'सहकारी' (Cooperative) तत्त्वावर चालवले जाणार आहे. सहकार मंत्रालय आणि राष्ट्रीय ई-गवर्नेंस विभागाने हे प्लॅटफॉर्म विकसित केले असून, यामध्ये चालक केवळ कर्मचारी नसून सह-मालक असतील. सध्याच्या खाजगी कंपन्या मोठा हिस्सा कमिशन म्हणून कापून घेतात, परंतु भारत टॅक्सीमध्ये चालकांना एकूण भाड्याच्या ८० टक्क्यांहून अधिक रक्कम मिळणार आहे. केवळ दिल्लीतच ५६,००० हून अधिक चालकांनी या अ‍ॅपवर नोंदणी पूर्ण केली आहे.

Bharat Taxi
Goa Teachers Recruitment: गोव्यात NEP ची होणार प्रभावी अंमलबजावणी! शाळांमध्ये 1008 शिक्षक, 377 इन्स्ट्रक्टर्सची होणार भरती

सुरक्षा आणि प्रादेशिक भाषांना प्राधान्य

सुरक्षेच्या दृष्टीने हे अ‍ॅप अत्यंत प्रगत आहे. यामध्ये रिअल-टाइम व्हेईकल ट्रॅकिंगची सुविधा असेल. केवळ पडताळणी झालेल्या (Verified) चालकांनाच प्लॅटफॉर्मवर प्रवेश दिला जाईल. विशेष म्हणजे, हे अ‍ॅप अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असल्याने ग्रामीण आणि निमशहरी भागातील लोकही ते सहज वापरू शकतील. २४ तास ग्राहक सेवा केंद्र प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सज्ज असेल. दिल्लीपासून सुरू होणारी ही सेवा लवकरच देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये विस्तारली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com