Bhagwant Mann: पंजाबमधील आप सरकार आणणार विश्वासदर्शक ठराव

'आप'च्या 10 आमदारांना भाजपची 25 कोटींची ऑफर; 'आप'चा आरोप
Punjab CM Bhagwant Mann
Punjab CM Bhagwant MannDainik Gomantak

Bhagwant Mann: पंजाबमधील आम आदमी पक्षाचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे असा आरोप करत, आप सरकारवर लोकांचा विश्वास आहे हे दाखवून देण्यासाठी मुख्यमंत्री भगवंत मान हे विधानसभेत विश्वासदर्शक ठराव (Confidence motion) आणणार आहेत.

Punjab CM Bhagwant Mann
PM मोदींनी माजी पंतप्रधान शिंजो आबेंच्या अंत्यसंस्काराला लावली हजेरी, पाहा व्हिडीओ

याबाबत मंगळवारी विधानसभेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना आप सरकारमधील मंत्री अमन अरोरा म्हणाले की, विश्वासदर्शक प्रस्ताव मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) सदनात मांडतील. पंजाबमधील 3 कोटी लोकांना हे कळले पाहिजे, की त्यांनी जो जनादेश आप सरकारच्या (AAP Government) बाजूने दिला आहे, त्या आप सरकारला काहीही धोका नाही.

दरम्यान, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची (AAP) निर्विवाद सत्ता आहे. 117 सदस्य असलेल्या पंजाब विधानसभेत आम आदमी पक्षाचे 92 आमदार आहेत. तथापि, गेल्या काही काळात राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातील बेबनाव निर्माण झाला आहे.

अधिवेशन बोलावण्यावरून आप सरकार आणि राजभवन यांच्यात वाद झाला होता. मुख्यमंत्री मान यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन २२ सप्टेंबरला बोलावले होते. पण, राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यास परवानगी दिली नाही. त्यानंतर हे अधिवेशन मंगळवारी 27 सप्टेंबर रोजी बोलाविण्यात आले. आता अधिवेशनाचा (Punjab Assembly Session) कालावधी 3 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आला आहे.

विरोधी पक्षनेते प्रतापसिंग बाजवा यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी एसवायएल कालवा, शांतता आणि सुव्यवस्था, आम आदमी पक्षाने महिलांना दर महिन्याला एक हजार रूपयांची केलेली निवडणूक घोषणा, बेरोजगारी, अवैध खणन याविषयांवर चर्चा व्हावी, अशी मागणी केली आहे.

Punjab CM Bhagwant Mann
Gujarat Assembly Election 2022 : गुजरात विधानसभेसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान?

'आप'चा भाजपवर आरोप

भाजपने पंजाबमध्येही ऑपरेशन लोटससाठी (Operation Lotus) प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपकडून आम आदमी पक्षाच्या किमान 10 आमदारांशी (MLA) संपर्क साधण्यात आला आहे. त्यांना 25 कोटी रूपयांची ऑफर देण्यात आली आहे. त्यातून पंजाबमध्ये सहा महिन्यांपुर्वी स्थापन झालेले मुख्यमंत्री भगवंत मान यांचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com