
Bengali girl Hemoshree Bhadra married with Australian Cricketer Travis Head photo:
ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात सलामीवीर ट्रॅव्हिस हेडचा सिंहाचा वाटा आहे. त्याच्या अंतिम सामन्यातील शतकामुळे ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकला आणि यासोबतच टीम इंडियाचे तिसऱ्यांचा टीम वर्ल्ड चॅम्पियन बनवण्याचं स्वप्न पूर्ण भंगले.
ट्रॅव्हिस त्याच्या चमकदार खेळामुळे सोशल मीडियावर चर्चेत असताना, एका भारतीय बंगाली मॉडेलने असे काही केले ज्यामुळे लोक तिच्यावर नाराज झाले आहेत. तर काहींनी तिला 'देशद्रोही' म्हटले आहे.
या बंगाली मॉडेलचे नाव हेमोश्री भद्रा आहे, जी स्वतःला ट्रॅव्हिसची मोठी फॅन म्हणवते. अंतिम सामन्यानंतर, तिने ट्रॅव्हिस हेडच्या फोटोशी विवाह केला आणि त्याच्या नावेचे सिंदूर लावले.
तिने स्वतः सोशल मीडियावर तिचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती बंगाली वधूच्या लूकमध्ये आहे आणि तिच्या कपाळावर सिंदूर आणि हातात ट्रॅव्हिसचा फोटो आहे.
या व्हिडिओमध्ये हेमोश्री भद्रा म्हणतेय, "मी ट्रॅव्हिस हेडच्या नावाचा सिंदूर लावला आहे. तो माझा स्वामी व्हावा अशी माझी इच्छा आहे. मी ट्रॅव्हिसबद्दल जितका जास्त विचार करते, तितका माझ्या चेहऱ्यावरील लालसरपणा वाढत आहे."
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक हेमोश्री भद्रावर भडकले आहेत आणि तिला ट्रोल करत आहेत. सोशल मीडियावर काही लोकांनी तिला 'देशद्रोही' म्हटले आहे.
तर एका यूजरने लिहिले की, 'ती अशा व्यक्तीशी लग्न करत आहे ज्याने देशाला हरवले, तिला देशाबाहेर हाकलून द्या, ती भारतात राहण्यास योग्य नाही.'
तर दुसऱ्या एकाने लिहिले की 'असे लोक कोणाचे नसतात, देशद्रोही असतात.' लोक हेमोश्री भद्रावर प्रचंड संतापले आहेत आणि तिच्या विरोधात उग्र विधाने करत आहेत.
बंगाली मॉडेल हेमोश्री भद्राच्या सोशल अकाउंटवरून असे दिसून येते की, ती एक लेखिका, मॉडेल, अभिनेत्री आणि YouTuber आहे. तिने 'मिस कोलकाता'चे विजेतेपदही पटकावले आहे.
इन्स्टाग्रामवर तिचे 7 लाख 23 हजार 666 फॉलोअर्स आहेत.
लोकांच्या वागण्याने हेमोश्री भद्रा खूप दुखावली आहे, ती म्हणते की, 'खेळ माणसांना जोडण्याचे काम करते हे तिने नेहमीच वाचले आहे आणि ऐकले आहे. पण इथे उलटे झाले आहे.'
ती पुढे म्हणते की, 'काही लोकांनी तिला जीवे मारण्याची धमकीही दिली आहे आणि त्यामुळे ती खूप घाबरली आहे.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.