Begging Rights: देशात 4 लाखांहून अधिक भिखाऱ्यांची संख्या; जाणून घ्या कोणत्या कायद्यानुसार भीख मागणे गुन्हा

Begging: आपलं आयुष्य चालवण्यासाठी भीख मागणे हा शेवटचा उपाय आहे.
Begging
BeggingDainik Gomantak

Begging: लोक रस्त्यावर त्यांच्या मर्जीने भीक मागत नाहीत, ते यासाठी भीक मागतात कारण ती त्यांची गरज आहे. आपलं आयुष्य चालवण्यासाठी भीख मागणे हा शेवटचा उपाय आहे.

2018 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या चीफ जस्टीस गीता मित्तल आणि जस्टीस हरिशंकर यांनी एका केसचा निकाल देताना म्हटले होते. न्यायालयाने भीक मागण्याला हा गुन्हाच्या श्रेणीत टाकण्यास विरोध दर्शवला होता .

याशिवाय कोर्टाने असे म्हटले होते की, भीक मागण्याला अपराध म्हणणे , गुन्हा ठरवणे हे काही कमजोर लोकांच्या मूलभूत हक्कावर गदा आणण्यासारखे होईल. सुप्रिम कोर्टाने देखील भीक मागण्याला गुन्हा ठरवण्यास नकार दिला होता.

Begging
G20 Meet in Goa: गोव्यात G20 च्या होणार 8 बैठका; 'या' दिवशी पहिली बैठक

दरम्यान, नागपूरला भिकारीमुक्त शहर बनवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे म्हटले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक जागांवर भीख मागणे अपराध आहे. त्याचबरोबर,इंग्रजांच्या काळापासून भिकाऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यातल्या एका कायद्यानुसार, रेल्वे स्टेशनवर भीक मागणे अपराध मानले जाते,

लोकसभेत 2021 ला दिलेल्या आकड्यानुसार, देशात 4 लाख 13 हजार भिखाऱ्यांची संख्या आहे. सध्या काही ठिकाणी भीख मागण्याला गुन्हा म्हणत असले तरीही सुप्रिम कोर्टाने याला गुन्हा मानण्यास नकार दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com