G20 Meet in Goa: गोव्यात G20 च्या होणार 8 बैठका; 'या' दिवशी पहिली बैठक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली माहिती
G20 Meet in Goa
G20 Meet in GoaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

G20 Meet in Goa 2023: आंतरराष्ट्रीय पातळीवरील जी-20 शिखर परिषदेच्या आठ बैठका गोव्यात होत आहेत. त्‍यातील पहिली 17 ते 19 एप्रिल अशी तीन दिवसांची बैठक ‘ताज’ आणि ‘ग्रँड हयात’ या दोन ठिकाणी होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी उद्योग व कौशल्‍य विकासमंत्री माविन गुदिन्हो उपस्थित होते.

G20 Meet in Goa
Mauvin Godinho: होय, सर्वाधिक महागडी कार वापरतो, पण... जाणून घ्या काय म्हणाले वाहतूक मंत्री

मुख्यमंत्री म्हणाले की, जी-20 शिखर परिषदेतील पहिली बैठक ही आरोग्य कार्यगटाशी संबंधित आहे. या परिषदेच्‍या पार्श्वभूमीवर पणजीत सध्या जी कामे सुरू आहेत, ती तातडीने पूर्ण करण्यात येतील.

त्यानंतरच्या उर्वरित बैठका जून आणि जुलैमध्ये होतील. त्या प्रामुख्याने पर्यटनाशी संबंधित असतील.

स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना नोकऱ्यांसाठी मुदतवाढ

गोवा मुक्तिलढ्यात योगदान दिलेल्‍या स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांसाठी नोकऱ्यांच्या योजनेला मुख्यमंत्र्यांनी आणखी एक वर्षाची मुदतवाढ दिली. आता केवळ 90 पात्र लाभार्थी शिल्लक असल्याने ही शेवटची मुदतवाढ असेल.

त्यांनी पदभार स्‍वीकारल्‍यानंतर या योजनेअंतर्गत 270 नोकऱ्या पूर्ण होतील. यापूर्वीच 200 ते 250 नोकऱ्या अशा लाभार्थींना देण्यात आल्या आहेत, असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

US Bank Layoffs India 80 Customer Service Employees
Amit Shah anti drug meeting
Goa Congress RG Meeting
House Of Abhinandan Mega project Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com