CBSE Latest Update: सीबीएसई रिझल्टपूर्वी मोठी बातमी! बोर्डाने जारी केला ॲक्सेस कोड; जाणून घ्या

CBSE Latest Update: सीबीएसई (CBSE) बोर्ड रिझल्ट 2024 पूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) एक परिपत्रक जारी केले आहे.
​CBSE Board Exam
​CBSE Board ExamDainik Gomantak

CBSE Latest Update: सीबीएसई (CBSE) बोर्ड रिझल्ट 2024 पूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) एक परिपत्रक जारी केले आहे, ज्यामध्ये सांगण्यात आले आहे की, विद्यार्थ्यांची डिजीलॉकर अकाऊंट्स ॲक्सेस कोड बेस्ड करण्यात आली आहेत. ते त्यांचे अकाऊंट्स सहा अंकी ॲक्सेस कोडसह ॲक्टिवेट करु शकतात. अकाऊंट्स ॲक्टिवेट केल्यानंतर विद्यार्थी त्यांच्या DigiLocker Account च्या 'इश्यू डॉक्युमेंट्स' सेक्शनमध्ये त्यांची डिजिटल ॲकेडेमिक डॉक्यूमेंट्स पाहू शकतील.

दरम्यान, डिजीलॉकर अकाऊंट्समधील विद्यार्थ्यांच्या डेटाची सुरक्षा आणि गोपनीयता सुधारण्यासाठी सीबीएसईने हा पुढाकार घेतला आहे. यासाठी CBSE बोर्डाने नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हिजन (NeGD) सोबत नवीन ॲक्सेस कोड सिस्टीम लागू करण्यासाठी भागीदारी केली आहे.

​CBSE Board Exam
CBSE Board 12th And 10th Result 2023: दहावीचे 93.12 तर, बारावीचे 87.33 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, येथे पाहा तुमचा निकाल

सीबीएसईच्या रिझल्टनंतर लगेचच कागदपत्रे उपलब्ध होतील

गेल्या दोन वर्षांपासून, CBSE 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ॲडव्हान्स डिजीलॉकर अकाऊंट्स तयार करत आहे. हा CBSE बोर्ड रिझल्ट जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी लगेचच CBSE डिजिटल रिपॉजिटरी, 'परिणम मंजुषा' वर अपलोड केलेली डिजिटल ॲकेडेमिक डॉक्यूमेंट्स ॲक्सेस करु शकतील. CBSE 10वी 12वी रिझल्ट 2024 ची तारीख 20 मे च्या आसपास निश्चित करण्यात आली आहे. CBSE बोर्ड रिझल्ट 2024 प्रसिद्ध झाल्यानंतर CBSE मार्कशीट आणि इतर डॉक्यूमेंट्स DigiLocker वरुन मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांकडे ॲक्सेस कोड असणे आवश्यक असेल.

CBSE डिजिलॉकर कोड: कुठे मिळेल?

सध्या हे कोड शाळांना त्यांच्या डिजीलॉकर अकाऊंट्सद्वारे दिले जात आहेत. यानंतर शाळा प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिकरित्या ॲक्सेस कोड देतील. याचा अर्थ विद्यार्थ्यांना त्यांच्या CBSE DigiLocker ॲक्सेस कोडसाठी त्यांच्या शाळेशी संपर्क साधावा लागेल.

​CBSE Board Exam
​CBSE Board Exam: सीबीएसई परीक्षांच्या तारखा जाहीर, असे डाऊनलोड करा वेळापत्रक

DigiLocker CBSE कोड डाउनलोड: कसे करावे?

CBSE DigiLocker वेबसाइटवर संबंधित लिंकला भेट द्या.

LOC क्रेडेन्शियल वापरुन लॉग इन करा.

ड्रॉपडाउनमधून “स्कूल म्हणून लॉगिन करा” हा पर्याय निवडा.

स्क्रीनच्या डाव्या पॅनलवरील “डाउनलोड ॲक्सेस कोड फाइल” पर्यायावर क्लिक करा.

एक नवीन स्क्रीन दिसेल. तेथून स्कूल पिन डाउनलोड करु शकतात.

इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी, CBSE 10वी डिजीलॉकर ॲक्सेस कोड डाउनलोड लिंकवर क्लिक करा.

12वीच्या विद्यार्थ्यांसाठी, CBSE 12वी डिजीलॉकर ॲक्सेस कोड डाउनलोड लिंकवर क्लिक करा.

फाइल डाउनलोड केल्यानंतर शाळा प्रत्येक विद्यार्थ्यासोबत ॲक्सेस कोड सुरक्षितपणे शेअर करु शकते.

शिवाय, विद्यार्थ्यांना डिजीलॉकरमध्ये ॲक्सेस करण्यात मदत करण्यासाठी त्याच पेजवर एक यूजर मॅन्युअल देखील आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com