Beating Retreat: अटारी सीमेवर पुन्हा सुरु होणार बीटिंग रिट्रीट सेरेमनी, पण... बीएसएफने घेतला मोठा निर्णय

Beating Retreat Ceremony India Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव काहीसा निवळला आहे. दरम्यान, अमृतसरमधील अटारी सीमेवर बीटिंग रिट्रीट सेरेमनी पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Beating Retreat
Beating RetreatDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव काहीसा निवळला आहे. दरम्यान, अमृतसरमधील अटारी सीमेवर बीटिंग रिट्रीट सेरेमनी पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण पहलगाम हल्ल्यानंतर बीएसएफने एक कडक संदेश देण्याचा पर्याय निवडला आहे. सेरेमनीदरम्यान ना गेट उघडण्यात येणार ना दोन्ही देशांचे कमांडर हस्तांदोलन करणार. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सीमेवरील बिटिंग रिट्रिट सेरेमनी बंद करण्यात आली होती.

बीएसएफने उचलले मोठे पाऊल

भारत (India) आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे 7 मे पासून पुढे ढकलण्यात आलेली बीटिंग रिट्रीट सेरेमनी मंगळवार (20 मे) पासून पुन्हा सुरु होणार आहे. सेरेमनीची वेळ संध्याकाळी 6:00 वाजता असेल. पण बीएसएफने निर्णय घेतला की, सेरेमनीदरम्यान दरवाजे उघडले जाणार नाहीत तसेच हस्तांदोलनही केले जाणार नाही. 1959 पासून दोन्ही देशांमध्ये बीटिंग रिट्रीट सेरेमनीची प्रथा आहे. अशीच परेड सेरेमनी अटारी-वाघा, हुसैनीवाला (फिरोजपूर) आणि साडकी बॉर्डर (फाजिल्का) येथेही आयोजित केली जाते.

Beating Retreat
India-Pakistan Water Dispute: पाकड्यांची चांगलीच जिरली! सिंधू जलवाटपाचा भारताला मोठा फायदा; वीजनिर्मितीत होणार 'एवढ्या' टक्क्यांची वाढ

रिट्रीट सेरेमनी म्हणजे काय?

भारत-पाकिस्तान (Pakistan) यांच्यात अटारी सीमेवर रिट्रीट सेरेमनी रोज संध्याकाळी 6.00 वाजता होते. ही सेरेमनी बीएसएफ (सीमा सुरक्षा दल) आणि पाकिस्तान रेंजर्स यांच्याद्वारे संयुक्तपणे आयोजित केली जाते. ही सेरेमनी पाहण्यासाठी देश-विदेशातून लोक येतात. सेरेमनीची वेळ ऋतूनुसार बदलते, परंतु साधारणपणे हिवाळ्यात दुपारी 4:15 वाजता आणि उन्हाळ्यात 5:15 वाजता सुरु होते. मंगळवारपासून म्हणजेच उद्यापासून ही सेरेमनी पुन्हा सुरु होत असल्याने लोकांना हा अनोखा अनुभव पुन्हा अनुभवण्याची संधी मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

India Slams Pakistan UN General Assembly
India Exposes Pakistan At UNHRC
Journalist Confronts Pakistani PM Over Terrorism
Pakistan Airstrikes on Afghanistan Kandahar
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com